Marathi Serial TRP: शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'ची कमाल; कला, मुक्ताला टाकलं मागे; 'बिग बॉस मराठी५' कितव्या स्थानावर?

Most Famous Marathi Serial Actress: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्या 'थोडं तुझं थोडं माझं' ने आता टीआरपीची सगळी गणितं बदलली आहेत.
marathi serial trp list
marathi serial trp listesakal
Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. काही मालिका बऱ्याच काळापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहतात तर काही मालिका सुरू झाल्यापासून काही महिन्यातच आपला गाशा गुंडाळतात. मात्र मालिका बंद होण्याचं हे गणित अवलंबून असतं ते टीआरपी वर. जर जास्त टीआरपी असेल तर मालिका सुरू राहतात. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यल्प असेल तर मात्र निर्माते मालिका बंद करण्याचा निर्णय घेतात. या आठवड्याचा टीआरपीदेखील आता समोर आला आहे. या आठवड्यात टीआरपीचं गणित चांगलंच बदललं आहे. या आठवड्यात शिवानी सुर्वेच्या मालिकेने इतरांना मागे टाकलं आहे.

या आठवड्यातही पहिल्या स्थानावर जुई गडकरींच्या 'ठरलं तर मग' ने ठाण मांडलं आहे. जुई गेले वर्षभर याच स्थानावर आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेला शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेने मागे टाकलं आहे. थोडं तुझं थोडं माझंने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेली 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. त्यानंतर मुक्ताची 'प्रेमाची गोष्ट ही मालिका आहे. तारा पाचव्या स्थानावर 'वेड लागलं प्रेमाचं ही मालिका आहे. सहाव्या क्रमांकावर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका आहे.

सातव्या क्रमांकावर 'अबोली' तर आठव्या क्रमांकावर 'साधी माणसं' ही मालिका आहे. या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ५ भाऊंचा धक्का नवव्या क्रमांकावर आहे. तर दहाव्या क्रमांकावर 'शुभ विवाह' ही मालिका आहे. तर 'बिग बॉस मराठी ५' सध्या १२ व्या स्थानावर आहे.' आता या आठवड्यात पुन्हा एकदा सगळी समीकरणं बदलण्याची शकयता आहे.

marathi serial trp list
Marathi Serials: कमी TRPचा फटका! झी अन् कलर्स मराठीवरील एक दोन नव्हे तर चार मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.