riteish deshmukh
riteish deshmukh esakal

देशमुखांच्या लेकरांनी बनवले गोड बाप्पा, रितेशचा भारी क्लास पण कौतुक होतंय जिनिलिया वहिनीचं, नेटकरी म्हणतात- मातीतला माणूस

Riteish Deshmukh Making Lord Ganesha With Kids: अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या मुलांसोबत मिळून दरवर्षीप्रमाणे मातीचा गणपती बनवला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Published on

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं तर केलंच पण त्याच्या वागण्याचं कायमच नेटकऱ्यांना कौतुक वाटत आलं आहे. रितेश आणि जिनिलिया ही जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. त्यांच्या मुलांच्या संस्कारांचंदेखील कायम कौतुक होत असतं. आता पुन्हा एकदा नेटकरी त्यांचं कौतुक करताना दिसतंय. रितेशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो आपल्या मुलांना शाडूच्या मातीचा गणपती बनवायला शिकवतोय. मुलंही अगदी गुंग झाली आहेत. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकरी महाराष्ट्राच्या वहिनी जिनिलिया हिचं जास्त कौतुक करताना दिसतायत.

सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा सध्या घरोघरी विराजमान झाले आहेत. आपला लाडका बाप्पा आल्यावर सगळं वातावरण अगदी भक्तिमय झालं आहे. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारही त्यांच्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवतात. देशमुख घराचीदेखील घरी गणपतीची मूर्ती घडवण्याची परंपरा आहे. त्यामुळे यावर्षी रितेशने आपल्या लहान लेकरांना मातीचा गणपती घरी बनवायला शिकवलं. त्याने एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे ज्यात तो आपल्या आणि भावाच्या मुलांना गणपती बनवायला शिकवतोय. रितेशने अतिशय सुंदर अशी मूर्ती घडवली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'तू खरा मातीतला माणूस आहेस. किती छान संस्कार करतोयस मुलांवर.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'पाहून खूप बरं वाटलं की मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा तू आतापासून शिकवतोयस. खूप कौतुक. त्यातही अनेक नेटकरी जिनिलियाचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'या कॅमेरा पकडणाऱ्या जिनिलिया वहिनी असणार आहेत.' दुसऱ्याने लिहिलं, 'खरं कौतुक तर जिनिलिया वहिनींचं आहे कारण अभिनय आणि घर त्या खूप छान सांभाळत आहेत. मुलांवर खूप चांगले संस्कार करतायत.' नेटकरी त्यांचा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा त्यांच्यावर फिदा झाले आहेत.

riteish deshmukh
Bigg Boss Marathi ५: घरात येताच संग्रामने एकाला दिली फुल्ल ऑन धमकी; नेटकरी म्हणाले- अर्रर्रर्र आता तर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...