Bigg Boss Marathi 5: सब गोलमाल है! जान्हवीने पॅडीची मागितलेली माफी स्क्रिप्टेड? बाहेरील परिस्थितीमुळे बिग बॉसने स्वतः दिले आदेश

Jahnavi Killekar Apologies Pandharinath Kamble Bigg Boss Marathi 5: अभिनेत्री जान्हवीने पंढरीनाथची माफी मागितल्यानंतर आता हे बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जातंय.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

छोट्या पडद्यावर गाजणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी ५' आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. टीम ए आणि टीम बी मध्ये दररोज होणारे वाद हे काही नवीन नाहीत मात्र दोन दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या एका टास्कमध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने तिच्याहून मोठा आणि अनुभवी अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. त्यावर पंढरीनाथने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यावरून सोशल मीडियावरील वातावरण चांगलंच तापलं. त्यावर दुसऱ्या दिवशी जान्हवीने त्याची माफीही मागितली मात्र आता हे बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जातंय.

पंढरीनाथ याच्या झालेल्या अपमानाचा नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनी निषेध केला. अनेक पोस्ट शेअर करत सगळे पॅडीच्या पाठीशी उभे राहिले. यापूर्वी जान्हवीने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला होता. आता पंढरीनाथ यांच्यासोबतही तेच घडलं त्यामुळे सगळेच संतापले. त्यानंतर जान्हवीने दुसऱ्या दिवशी रडत त्याची माफी मागितली. मात्र ही माफी स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जातंय. प्रेक्षकांमध्ये जान्हवीबद्दलचा वाढणारा संताप पाहून बिग बॉसने तिला पंढरीनाथची माफी मागायला सांगितलं अशा प्रतिक्रिया प्रेक्षक सोशल मीडियावर देत आहेत. त्यामुळे हे बिग बॉस स्क्रिप्टेड आहे सगळं ठरलेलं आहे. बिग बॉस जान्हवी आणि निकी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं नेटकरी सांगत आहेत.

bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'बाहेर तापलेलं वातावरण बघून शो वर काही परिणाम होऊ नये म्हणून बिग बॉसने स्क्रिप्टेड माफीनामा लिहून दिला असं वाटत आहे. जर खरंच गिल्ट होती तर सकाळी सकाळी माफी का नाही मागितली? माफी मागण्यापुर्वी चेहर्‍यावर कुठेही गिल्ट दिसत नव्हती. जनता सुजाण आहे त्यांना सत्य आणि स्क्रिप्ट यातील फरक कळतो.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'कोणाकोणाला वाटतंय की बिग बॉसने बाहेरील परिस्थिती पाहून जान्हवीला माफी मागायला सांगितली आहे.' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे खरच बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi 5: तो बाबाचा स्वभाव नाही म्हणून... वडिलांचा अपमान करणाऱ्या जान्हवीवर संतापली पंढरीनाथ कांबळेची लेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.