Bigg Boss Marathi Season 5 : "मी असं फालतू ऐकून घेणार नाही..", इरिनामुळे वैभवने निक्कीला चांगलच सुनावलं

Vaibhav Chavan Fight With Nikki Tamboli: इरिनाचं ए ग्रुपमध्ये राहणं निक्की तांबोळीला खटकतय. यावरुनच ए ग्रुपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय.
vaibhav chavan
vaibhav chavan esakal
Updated on

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काहीना काही वाद होताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनने अगदी पहिल्या दिवसापासूनच खेळात रंगत आणली आहे. यातच घरात दोन ग्रुप झाले आहेत, ज्यात ए ग्रुपमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव आहेत तर इतर सदस्य बी ग्रुपमध्ये आहेत. मात्र वैभवसोबतच्या मैत्रीमुळे इरिना देखील नकळत ए ग्रुपचा भाग झाली. मात्र इरिनाचं ए ग्रुपमध्ये राहणं निक्की तांबोळीला खटकतय. यावरुनच ए ग्रुपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय. इरिनामुळे आता वैभव आणि निक्कीचा मैत्रीत फूट पडून दोघांमध्ये वाद झालाय.

यंदाच्या आठवड्यात ए ग्रुपमधील वैभव आणि इरिना नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे ए ग्रुपमध्ये वादंग सुरु झालाय. यातच निक्कीने इरिनाबद्दल केलेलं विधान वैभवला खटकलय. निक्की म्हंटली की, "बरं झालं इरिना नॉमिनेट झाली, आता एलिमिनेट पण झाली पाहिजे, ती माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती, ती अॅड ऑन झाली आहे." यावरुन वैभव संतापला आणि त्याने निक्कीला सडेतोड असं उत्तर दिलय. वैभव निक्कीला म्हंटला की, "अती होतय निक्की आता, मी असं फालतू ऐकून घेणार नाही.."

वैभव आणि इरिनाची बिग बॉस मराठीच्या घरात चांगलीच मैत्री झालीय. शिवाय दोघांची जवळीक त्यांचं नातं घट्ट असल्याचं सिद्ध करतेय. मात्र निक्कीला इरिनाचं ग्रुपमध्ये असणं खटकतय. मात्र निक्कीचं इरिनाबद्दल बोलणं वैभवला पटलेलं दिसत नाहीय. म्हणूनच त्याने निक्कीविरोधात पहिल्यांदाच आवाज उठवलाय.

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात विविध नाती बनताना आणि तुटताना दिसत आहेत. यातच अरबाज आणि निक्कीच्या नात्यातही फूट पडताना दिसलीय. एकीकडे निक्की ए ग्रुप पासून दुरावताना दिसतेय तर दुसरीकडे निक्कीची अभिजीत सावंत सोबतची मैत्री घट्ट होताना दिसत आहे. यंदा निक्कीच्या वाढदिवसानिमित्त घरात सेलिब्रेशन झालं. बिग बॉसने केक पाठवला आणि निक्कीचा वाढदिवस सर्व सदस्यांनी साजरा केला. मात्र यानंतर आता निक्कीचे अनेकांसोबत खटके उडताना दिसत आहेत. या खेळात सुरुवातीला निक्की आणि वर्षा उसगांवकर यांची नोकझोक पाहायला मिळाली होती. मात्र आता निक्कीचे इतरांसोबत वाद होताना दिसत आहेत.

मात्र आठवडाभर राडा घातल्यानंतर विकएन्डला भाऊच्या धक्क्यावर या सगळ्यांची शाळा घेतली जाणार एवढं नक्की आहे. जान्हवीने पॅडीचा अपमान केला यापासून ते निक्कीचा ए ग्रुपसोबतचा वाद या सगळ्या मुद्द्यांवर रितेश देशमुख काय म्हणतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

vaibhav chavan
Bigg Boss Marathi 5: सब गोलमाल है! जान्हवीने पॅडीची मागितलेली माफी स्क्रिप्टेड? बाहेरील परिस्थितीमुळे बिग बॉसने स्वतः दिले आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.