मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्या ९० च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या वर्षा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांनी अक्षय कुमार, नाना पाटेकर यांसारख्या अनेक हिंदी अभिनेत्यांसोबत काम केलं. त्यांची प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज होती. त्या चित्रपटांसोबत त्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही करायच्या. अशाच एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या मुलाखतीसाठी थांबलेला पत्रकार त्यांना असं काही बोलला ज्यामुळे त्यांना आपली चूक कळून आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ती घटना सांगितली आहे.
वर्षा यांनी नुकतीच दिल के करीब या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्या म्हणाल्या, 'एकदा मी नागपूरला गेलेलं. मी तेव्हा ऑर्केस्ट्राचा पण कार्यक्रम करायचे. आम्ही 'वर्षा उसगावकर नाइट्स' असे शो करायचे आणि शो हाऊसफुल व्हायचे. एकदा असाच एक शो होता आणि एक पत्रकार होता, त्याला माझी मुलाखत घ्यायची होती. तेव्हा मी लहान होते, एक अल्लडपणा होता. तेव्हा मी त्यांच्याशी जरा वाईट पद्धतीने बोलले. अहो नाहीये माझ्याकडे वेळ मुलाखतीसाठी, मी नाही देऊ शकत असं म्हणाले. एक पण सांगायची देखील एक पद्धत असते.
मी त्यांना हे थोडंसं तिखटपणे सांगितलं. आणि ते बिचारे एवढे थांबले होते. इतका वेळ थांबले होते. ते मला फक्त एवढंच म्हणाले, थँक यू मॅडम थँक यू फॉर नथिंग. त्यांचं ते वाक्य मला खूप लागलं. मला वाटलं मी त्यांना काहीच देऊ शकले नाहीये. मी त्यांच्या काहीच उपयोगी पडले नाहीये. असं कसं घडलं माझ्याकडून. मी त्यांना निराश केलं. तो पत्रकार कोण होता मला माहीत नाही पण तेव्हापासून ठरवलं पत्रकारांना कधीही निराश करायचं नाही. आता तरी पत्रकारांना थोड्याफार सुविधा आहेत पण तेव्हा त्यांना काहीच मिळत नव्हतं. बिचार कुठून कुठून आमची मुलाखत घ्यायला यायचे.त्यांचे हाल व्हायचे तरीही ते त्यांचं काम इमाने इतबारे करायचे. तेव्हापासून मी माझ्या स्वभावातही बदल केला.' वर्षा या सध्या स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.