देशमुखांच्या सुनांचा नाद करायचा नाय! जाऊबाईंसोबत जिनिलियाने उचलली गणरायाची मूर्ती; केलं घरातल्या बाप्पाचं विसर्जन

Genelia Deshmukh Did Ganpati Visarjan With Jaubai Aditi Deshmukh : लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याच्या घरातील गणपतीच्या विसर्जनाची सध्या जोरदार चर्चा आहे.
genelia deshmukh
genelia deshmukh esakal
Updated on

यंदाचा गणेशोत्सव सगळ्याच कलाकारांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आलेले. ११ दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणरायाने अनंत चतुर्दशीला आपल्या भक्तांचा निरोप घेतला. कलाकारांनीही बाप्पाचा निरोप घेतला. मात्र यंदाचा देशमुखांचा बाप्पा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे बाप्पाचं विसर्जन. यावर्षी देशमुखांच्या सुनांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. त्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होतोय. त्यात जिनिलिया तिच्या जाऊबाईंसोबत गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाताना दिसतेय.

दरवर्षी रितेश देशमुख आपल्या भावांसोबत आणि इतर कुटुंबियांसोबत मिळून गणपती बाप्पाचं विर्सजन करतो. मात्र यावर्षी तो शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने ही जबाबदारी देशमुखांच्या सुनांनी पेलली आहे. रितेशचे मोठे भाऊ आणि खासदार अमित देशमुख यांची पत्नी आणि अभिनेत्री आदिती देशमुख यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्या जाऊबाई जिनिलियासोबत मिळून बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना दिसतायत. सुरुवातीला घरातील लहान मुलं आणि मग दोन्ही जावा मिळून गणरायाची आरती करतात. नंतर त्या मिळून गणेशाची मूर्ती उचलतात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ती मूर्ती घरातून गाडीत आणून ठेवतात.

हे करताना त्या दोघीही खूप आनंदी दिसतायत. हा व्हिडिओ जिनिलियानेही तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. यात तिने लिहिलं, 'दरवर्षी आम्ही बाप्पाची मूर्ती उचलायला लाजतो कारण आम्हाला वाटतं आमच्याकडून ते होणार नाही. पण आदिती वहिनी आणि मला जणू बाप्पा सांगत होता की तुम्ही हे करू शकता. आणि माही केलं.' त्यांचा हा व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. आणि प्रेक्षक त्यांच्या या कृतीचं कौतुक करतायत. रितेश सध्या ''बिग बॉस मराठी ५' च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर त्याचे अनेक नवे प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोबतच प्रेक्षक जिनिलियाच्या नव्या चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

genelia deshmukh
घरी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसादला सगळ्यात आधी विचारला तो प्रश्न; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.