लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्या दिग्दर्शनात बनलेला स्वातंत्रवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपट 'वीर सावरकर' हा ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. मात्र आता ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आलं आहे. स्वतः एफ एफ आयच्या अध्यक्षांनी या बातमीची खिल्ली उडवत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. मात्र फेडरेशन ऑफ इंडियाने खरं सांगत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मंगळवारी 'वीर सावरकर' या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी एक पोस्ट करत म्हटलेलं, 'मला ठाऊक नाही हे कधी झालं. पण मला आनंद होतोय. 'वीर सावरकर' चित्रपट एफएफआय तर्फे प्रस्तुत केला गेलाय. ऑस्करमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे.' या पोस्टनंतर अनेकांना असं वाटलं की या चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत निवड झाली आहे. मात्र यावर एफएफआयचे अध्यक्ष रवी कोट्टाकारायांनी एचटी सिटीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते या बातमीवर हसले. त्यानंतर ते हसत म्हणाले, 'सावरकरच्या निर्मात्यांनी काहीतरी गडबड केलीये. त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांनी चुकीची माहिती दिली आहे. मी या बद्दल एक अधिकृत माहिती देतो की भारताकडून फक्त 'लापता लेडीज'ची ऑस्करसाठी निवड झाली आहे.
याबद्दल आणखी एक गोष्ट समोर आली ज्यात सूत्रांच्या माहितीनुसार, हे खूप संशयास्पद आहे कारण याबद्दल रणदीप हुड्डाच्या नावाने एक जाहिरात देखील दिली गेलीये. मात्र रणदीपने अशी कोणतीही जाहिरात दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.