गिरणगावातील बालपण ते लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतची मैत्री; विजय कदम यांच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील

Vijay Kadam Unknown Facts: लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांनी आज १० ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेतला. गिरणगावातील मुलाने गाजवलेलं दादा कोंडकेंचं लोकनाट्य; असा होता विजय कदम यांचा जीवनप्रवास
vijay kadam life story
vijay kadam life story esakal
Updated on

Vijay Kadam Laxmikant Berde Friendship: लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं असं अचानक जाणं हे मनाला चटका लावून जाणारं होतं. मराठी सिनेसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज १० ऑगस्ट २०२४ रोजी विजय यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अभिनयाची जाण अफाट होती. आपल्या अभिनयाच्या ताकदीवर त्यांनी अनेक लोकनाट्य, चित्रपट गाजवले. मात्र त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती दादा कोंडके यांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्याने. मात्र विजय यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना ठाऊक नाहीत.

बालपण ते विच्छाचा प्रवास

विजय यांचं जन्म गिरणगावात झाला. तिथेच त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या घराच्या शेजारी चार गिरणी होत्या. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांना जाणवायला लागलं की त्यांच्या आजूबाजूला कीर्तन चालू आहे. पोवाडे चालू आहेत, दांडपट्टा, लेझीम चालू आहे. धनगरी गज्जा चालू आहे. तिथे गणपतीमध्येही सगळी लोकनाट्य व्हायची. त्यांना तर या सगळ्याचं जणू बाळकडूच मिळालं. त्यात त्यांच्या शाळेत शिरोडकर हायस्कुलमध्ये असा नियम होता की प्रत्येक वर्गाने वर्षातून दोनदा नाटक, गाणं, एकांकिका असं काहीतरी सादरीकरण करायचं. तेव्हापासून विजय हे लोकनाट्य करत होते पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

लक्ष्मीकांत यांची एक्झिट आणि विजय यांची एंट्री

लक्ष्मीकांत आणि विजय कदम हे दोघेही अतिशय जवळचे मित्र होते. ते दोघेही एकत्र 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्यात काम करणार होते. हे लोकनाट्य आधी अभिनेते दादा कोंडके यांनी केलं होतं. यासाठी लक्ष्याची हवालदार आणि विजय यांची शिपाई म्हणून निवड झाली होती. पण लक्ष्याचं 'टूरटूर', 'शांतीचं कार्ट' चित्रपट असं बरंच काही सुरू होतं. त्यामुळे त्याने निर्मात्यांना सांगितलं की त्याला ही भूमिका करायला जमणार नाही तुम्ही विजय यांना ती भूमिका द्या. अशी विजय यांना हवालदार ही भूमिका मिळाली आणि त्यांनी त्या भूमिकेचं सोनं केलं.

दादा कोंडकेंनी केलं कौतुक

दादा कोंडके यांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे विजय कदम यांनी सहा वेळा तरी पाहिलं होतं. जेव्हा विजय यांचा या नाटकाचा पहिला प्रयोग होता तेव्हा दादांनी शुभेच्छा देण्यासाठी दोन कलावंत माणसं पाठवली होती. माझा प्रयोग झाल्यावर ते विजय यांना भेटले. दादांनी आपलं पोरगं म्हणत विजय यांचं कौतुक केलं होतं. हे ऐकल्यावर विजय कदम यांना भरून आलं. त्यानंतर जेव्हा दादा विजय यांना कोल्हापूरला भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गुपचूप येऊन तुझं नाटक पाहून गेलोय. हे ऐकून विजय चकीत झाले होते.

विजय यांची पत्नी पद्मश्री यादेखील अभिनेत्री आहेत. त्यांनी १९८७ साली लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. नाटकं केली. आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगी विजय यांच्या पत्नीने त्यांची खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयावर देखील पद्मश्री यांनी आक्षेप घेतला नाही. त्या नेहमीच पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी राहिल्या. आता विजय यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

vijay kadam life story
Vijay Kadam: तो आजारी होता हे... विजय कदम यांच्या निधनाने प्रशांत दामले भावुक, प्रतिक्रिया देत म्हणाले-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com