छत्रपती संभाजी महाराजांवरील 'छावा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मात्र चित्रपटासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो दिग्दर्शक. हा चित्रपट कुणाच्या नजरेतून दिसणार आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव विकणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचा प्रवास इतका रंजक आहे की त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरही एक चित्रपट बनू शकतो. हा मराठी दिग्दर्शक आहे लक्षण उतेकर.
लक्ष्मण उतेकर हे फार कमी वयात आपलं गाव सोडून मुंबईत आले. जगण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव विकायला सुरुवात केली. मात्र एके दिवशी नगरपालिकेच्या माणसांनी त्याची गाडी तोडून टाकली. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्रात एका स्टुडिओमध्ये झाडू मारण्याचं काम असल्याची जाहिरात पाहिली. ते तिथे काम करू लागले. तिथे त्यांची ओळख कॅमेरासोबत झाली. तिथेच एका कॅमेरा अटेंडेंटची गरज होती आणि लक्ष्मण यांनी ती संधी सोडली नाही. त्यानंतर ते आपल्या मेहनतीवर चीफ कॅमेरा पर्सन, सहाय्यक कॅमेरामन ते मुख्य कॅमेरामन बनले.
त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. या क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी म्युझिक व्हिडिओपासून पुढे मोठे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी 'इंग्लिश विंग्लिश', 'खन्ना अँड अय्यर' या चित्रपटांसाठी कॅमेरामन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी 'मिमी', 'लुकाछुपी' असे चित्रपट दिग्दर्शित केले. आता त्यांनी 'छावा' या चित्रपटाचं देखील दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.