Chhava Teaser Leak: काय सांगता! विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर लीक; संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेत्याचा तांडव, रिलीज डेटही समोर

Vicky Kaushal Chhava Teaser Leak: लोकप्रिय अभिनेता विकी कौशल याच्या आगामी 'छावा' चित्रपटाचा टीझर आता ऑनलाइन लीक झाला आहे.
chhava movie teaser
chhava movie teaseresakal
Updated on

Chhava Movie Leaked Teaser: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या रोमँटिक भूमिकादेखील प्रेक्षकांमध्ये व्हायरल झाल्या. मात्र आता विकीचे चाहते त्याला एका वेगळ्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रेक्षक त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला होता. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत असतानाच आता चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'स्त्री २' सिनेमाच्या आधी चित्रपटगृहात हा टीझर दाखवण्यात येतोय जो आता एक्सवर लीक झाला आहे.

सध्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २'ची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. अशातच हा चित्रपट सुरू होणयापूर्वी 'छावा'चा टीझर थिएटरमध्ये दाखवण्यात येतोय. एका युझरने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांचे लढाईचे सीन दाखवण्यात आले आहेत. तो गनिमांशी दोन हात करताना दिसत आहे. तर त्याचं रौद्ररूप हे संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी मिळतंजुळतं आहे. या टीझरमध्ये हजारो गनिमांशी तो एकटा भिडताना दिसत आहे. वाघाच्या पिल्लाला छावा म्हणतात असं तो म्हणतोय. हजारो लोकांनी हा टीझर ऑनलाइन पाहिला आहे.

'छावा' सिनेमाचा टीझर लीक होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. विकीच्या संभाजी महाराजांच्या लूकला आणि त्याच्या अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळतेय. 'छावा' सिनेमाच्या लीक झालेल्या टीझरमध्ये सिनेमाची रिलीज डेटही बघायला मिळतेय. येत्या ६ डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूूमिकेत झळकणार आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही विशेष भूमिकेत दिसणार आहे.

chhava movie teaser
Stree 2 Twitter Review: पैसा वसूल की... कसा आहे श्रद्धाचा 'स्त्री २'? तिकीट काढण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.