चित्रपट फ्लॉप, कोट्यवधींचं नुकसान; अभिनेता पोहोचला फ्रेंच सर्कसमध्ये, परत येताच तीन महिन्यात फेडलं कर्ज

Vidyut Jammwal: 'क्रॅक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर अभिनेत्याने थेट फ्रेंच सर्कस गाठली होती.
Vidyut Jammwal
Vidyut Jammwalsakal

Vidyut Jammwal Unknown Story:अभिनेता विद्युत जामवालचा 'क्रॅक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने जवळपास १७ कोटींची कमाई केली. पण हा चित्रपट ४५ कोटीच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटानंतर विद्युत जामवालला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली होती. त्यामुळे त्याला खूप आर्थिक नुकसान झालं. मात्र हे नुकसान झाल्यावर तो थेट फ्रेंच सर्कसमध्ये पोहोचला होता. तिथून आल्यावर आपण अवघ्या तीन महिन्यात सगळं कर्ज फेडलं असं त्याने मुलाखतीत सांगितलं.

नेमकं काय म्हणाला विद्युत?

विद्युत म्हणाला, "मी खूप पैसे वाया घालवले होते. त्यावेळी माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की या सगळ्या गोष्टींना सामोरं कसं जायचं? पैसे वाया गेल्यानंतर खूप सल्ले मिळतात. मला त्यापासून दूर जाणं खूप कठीण होतं. पण या गोष्टींपासून दूर जाणं आवश्यक होतं. क्रॅकच्या रिलीजनंतर, मी फ्रेंच सर्कसमध्ये गेलो आणि तिथे सुमारे १४ दिवस घालवले. तिथे मी एका कंटोर्शनिस्ट सोबत वेळ घालवला. मी त्याच्याशी बोललो. तिथून जेव्हा परत मुंबईत आलो तेव्हा मात्र मला खूप बरं वाटत होतं.'

काय झाला फायदा?

विद्युत पुढे म्हणाला, "मी परत आलो तेव्हा काही वेळ बसून विचार केला मग वाटलं की मी खूप पैसे खर्च केले आहेत. पण आता मी काय करायला पाहिजे? त्यानंतर तीन महिन्यांत मी माझं सर्व कर्ज फेडलं.” त्याने सांगितलं की, जेव्हा माझ्या मित्रांनी मला विचारलं की हे कसं केलं, तेव्हा विद्युतने उत्तर दिलं की त्याने जास्त ताण घेतला नाही आणि गेम प्लॅनवर काम केलं. पण, त्याचा काय प्लॅन होता याचा मात्र त्याने खुलासा केला नाही.

Vidyut Jammwal
डोईवरती पडती अक्षता... दिग्दर्शक समीर विद्वांस अडकला लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, पाहा फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com