चोराच्या उलट्या बोंबा! 'सन ऑफ सरदार २' मधून लोकप्रिय अभिनेत्याची हकालपट्टी; पण अभिनेत्याचे भलतेच आरोप

Vijay Raaz Ouster From Son Of Sardaar 2: 'सन ऑफ सरदार' या चित्रपटातून अभिनेता विजय राज याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र त्यानंतर अभिनेत्याने अजय देवगनवरच उलट आरोप केले आहेत.
vijay raaz ajay devgn
vijay raaz ajay devgneakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सध्या या चित्रपटाची युकेमध्ये शूटिंग सुरू आहे. यापूर्वी अभिनेता संजय दत्त यांनी या चित्रपटातून माघार घेतली होती. आता आणखी एका अभिनेत्यामुळे हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच चर्चेत आहे. अभिनेता विजय राज याच्या सेटवरील वाईट वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र अभिनेत्याने त्याच्यावरील आरोपांचं खंडन करत उलट निर्माते आणि अजय देवगन यांच्यावरच आरोप केले आहेत. आता विजयच्या जागी अभिनेते संजय मिश्रा यांना घेण्यात आलं आहे. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे?

नेमका वाद काय?

चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, 'हो हे खरं आहे कि आम्ही त्याच्या वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकलंय. त्याने मोठा रूम आणि व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली होती. त्याच्या स्पॉट बॉयला दिवसाचे २० हजार रुपये दिले जात होते जे एका लोकप्रिय अभिनेत्याच्या स्पॉटबॉयलाही दिले जात नाहीत. युके एक महागडी जागा आहे . तरीही सगळ्यांना चांगले रूम मिळाले होते. मात्र विजयने प्रीमियम सूटची मागणी केली. मी जेव्हा त्याच्याशी याबद्दल बोलायला गेलो तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्याकडे आलेला या भूमिकेसाठी मी थोडीच तुमच्याकडे काम मागायला आलो होतो. त्यानंतर त्याचं वागणं आणखी वाईट झालं.'

विजयने मांडली त्याची बाजू

ते पुढे म्हणाले, '३ लोकांसाठी त्याला २ गाड्या हव्या होत्या. आम्ही असं कसं करू शकतो. जेव्हा नकार दिला तेव्हा तो आमच्याशी वाईट पद्धतीने बोलला. त्यानंतर आम्ही त्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.' यावर विजय राजने पिंकविलाला मुलाखतीत आपली बाजू मांडली.तो म्हणाला, 'मी पहिल्या दिवशी सेटवर गेलो. तिथे रवी किशन, ईपी, आशिष आणि निर्माता कुमार मंगत पाठक मला भेटले. त्यानंतर जेव्हा अजय देवगन सेटवर आला तेव्हा मी त्याला हाय बोलायला गेलो नाही कारण मी एका कामात होतो. त्यानंतर २५ मिनिटांनी मला सांगण्यात आलं की तुम्ही या चित्रपटातून बाहेर आहात. आम्ही तुम्हाला काढतोय.'

त्यानंतर विजय म्हणाला, 'माझी फक्त एकच चूक झाली की मी अजयला अभिवादन केलं नाही. मी त्याच्या क्रूला नाही भेटलो. मला एक अतिशय छोटा रूम दिला गेला जिथे फिरायलाही जागा नव्हती. मी एक योग करणारा माणूस आहे. पण तिथे अजिबात जागा नव्हती. मला इंडस्ट्रीमध्ये २६ वर्ष झाली, मी एवढंही मागू शकत नाही?' यावरही निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की त्याला अजयला हाय म्हटलं नाही म्हणून हटवण्यात आलेलं नाही. तर त्याच्या मागण्या संपायचं नाव घेत नव्हत्या. आता त्याने ते पैसेही परत द्यायला नकार दिला जे त्याने ऍडव्हान्समध्ये घेतले होते. यासगळ्यात चित्रपटाची वाईट पब्लिसिटी होतेय हे मात्र नक्की.

vijay raaz ajay devgn
आपल्याच लोकांनी केला घात! FRIENDS फेम Matthew Perry ची झाली हत्या, दोन डॉक्टरांसह ५ जणांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.