लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तो एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसतोय. तर वैयक्तिक आयुष्यात तो तमन्ना भाटियाला डेट करत असल्याचं बोललं जातंय. आता विजय वर्मा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयची 'IC 814: द कंधार हायजॅक' ही सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सीरीजवरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्सवरील या सीरिजमध्ये गोष्टी बदलून दाखवल्यामुळे नेटकरी चांगलेच चिडले आहेत. तर याची दखल थेट मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाकडून नेटफ्लिक्सला नोटीस बजावण्यात आली आहे.
'IC 814: द कंधार हायजॅक' ही सीरिज खऱ्या घटनेवर आधारीत आहे. या १९९९ साली भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका विमानाला पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. त्यांच्या बदल्यात त्यांनी भारतात असलेल्या काही दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. या घटनेवर आधारलेल्या या सीरिजमध्ये दहशतवाद्यांची नावंच बदलण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. मुसलमान असलेल्या या दहशतवाद्यांची नावं बदलून हिंदू करण्यात आली आहेत.
हे विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांची नावं इब्राहिम अतहर, शाहिद अख्तर सैयद, सनी अहमद काजी, जहूर मिस्त्री आणि शाकिर अशी होती. हे सगळे पाकिस्तानातील एका दहशतवादी गटाशी जोडलेले होते हे सिद्ध झालं होतं, मात्र सीरिजमध्ये त्याची नाव भोला आणि शंकर अशी दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण चांगलंच तापलं आहे.
याप्रकरणाची दखल आता मंत्रालयाने देखील घेतली आहे. 'IC814' या वेबसीरीजवरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडना माहिती प्रसारण मंत्रालयाकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडना उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IC814 या कंदाहार विमान हायजॅकप्रकरणी तयार करण्यात आलेल्या वेबसिरीजमधून नेटफ्लिक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक गैर- मुस्लिम नावे देण्यात आल्याचा नेटफ्लिक्सवर आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.