मीडियाचं खोटं आणि गोध्रा हत्याकांडाचं सत्य उघड होणार; विक्रांत मासीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलरचा धुमाकूळ

The Sabarmati Report Trailer: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विक्रांत मासी याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे.
the sabarmati report trailer
the sabarmati report traileresakal
Updated on

The Sabarmati Report Release Date: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मासी याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी २००२ साली गुजरात येथील गोध्रा रेल्वे स्टेशनवरून निघालेली साबरमती एक्सप्रेस चेन ओढून रोखण्यात आली आणि या ट्रेनच्या एका डब्याला आग लागली होती. यात ५९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र ही आग लागली की लावण्यात आली याबद्दल अजूनही मतमतांतरं आहेत. ही आग लावण्यात आल्याचं सांगण्यात येतं. यात ज्यांचा मृत्यू झाला ते हिंदू भाविक आयोध्येहून गुजरातला परत जात होते. त्यानंतर मोठी दंगल उसळली होती. याच विषयावर आधारित 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय.

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच पत्रकार म्हणून स्ट्रगल करणारा हिंदी भाषिक विक्रांत दिसतोय. जो एका इंग्लिश चॅनेलमध्ये काम करतोय. इंग्रजीचा पगडा असलेल्या चॅनेलवर तो काम करतोय मात्र त्यानंतर घडतं ते गोध्रा हत्याकांड. या गोष्टीचं तो समोरून कव्हरेज करतोय मात्र बोलणारी चॅनेलची अँकर जनतेला खोटं सांगतेय. हे सगळं कसं घडलं कुणी घडवलं हे ठाऊक असताना देखील त्याबद्दल बोललं जात नाहिये आणि मीडिया सत्य लपवण्यावर भर देतेय. हे पाहून तो सगळ्यांना जाब विचारतो. दुसऱ्या एका पत्रकारासोबत मिळून तो या प्रकरणाचं सत्य बाहेर काढायचं ठरवतो. त्यानंतर येणारे अडथळे, भांडणं सगळ्याची झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलीये. हे सत्य बाहेर येणार का हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल मात्र ट्रेलर पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

या चित्रपटात विक्रांतसोबत डोग्रा आणि राशी खन्नादेखील आहेत. हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

the sabarmati report trailer
नातेवाईक ६ नंबर म्हणायचे... प्रणित हाटेने सांगितला बालपणीचा कटू अनुभव; काकाने साडी नेसताना पकडलं आणि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.