आज ११ सप्टेंबर रोजी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी अचानक आत्महत्या केली. हा दिवस मलायकाच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस म्हणता येईल. मलायकासोबतच सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. तिचे वडील अनिल अरोरा यांचं घराच्या बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला. आता त्यांनी आत्महत्या केली की ते घसरून पडले याबद्दल पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र अजून तरी कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. अशात त्यांना कोणता मानसिक त्रास होता का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र मलायकाचे वडील काय काम करायचे असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.
मलायकाच्या वडिलांबद्दल ही बातमी येताच अनेकांच्या मनात हा प्रश्न आला की तिचे वडील नेमकं काय काम करायचे, ते फिल्म इंडस्ट्रीशी निगडित काही काम करायचे का? असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अरोरा हे सिनेसृष्टीशी संबंधित नव्हते. त्यांच्या दोन्ही मुली जरी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्यांचा त्यात काहीही वाटा नव्हता. मलायकाच्या वडिलांनी पत्नी जॉयस पॉलीकार्प यांच्याशी खूप आधी घटस्फोट घेतला होता. तेव्हा मलायका फक्त ११ वर्षांची होती. अनिल हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे.
अनिल अरोरा आपल्या पत्नीसह ठाणे येथे राहत होते. मलायकाचा जन्म देखील तिथेच झाला. मलायका 11 वर्षांची असताना त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर जॉयस आपल्या मुली मलायका आणि अमृतासोबत चेंबूरला राहायला गेल्या. इथे त्यांनी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केली आणि कठोर परिश्रमाने आपल्या मुलींना शिक्षण दिले आणि त्यांना यशस्वी केले. आज त्यांच्या मुली कुटुंबाची खूप काळजी घेतात. अनिल हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.