एकता कपूर दिग्दर्शित 'कसौटी जिंदगी की' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आजही प्रेक्षकांच्या मनात या कार्यक्रमाच्या आठवणी ताज्या आहेत. मालिकेच्या पात्रांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. या मालिकेत श्वेता तिवारीने प्रेरणाची भूमिका साकारली होती तर सेझन खानने अनुरागची भूमिका साकारली होती. नंतरच्या भागांमध्ये, अपर्णा नावाच्या खलनायिकेची एंट्री झाली जिचं पुढे अनुरागशी झालं होतं. ही व्यक्तिरेखा साकारलेली मराठमोळी अभिनेत्री गीतांजली टिकेकर हिने. 23 वर्षांनंतर ती आता कुठे आहे, ती काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'कसौटी जिंदगी की' ही मालिका २००१ साली स्टार प्लसवर सुरू झाली होती. यात श्वेता तिवारी, सेझन खान, हितेन तेजवानी, रोनित रॉय आणि उर्वशी ढोलकियासह अनेक स्टार्स दिसले. फेब्रुवारी 2008 मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अनुराग आणि प्रेरणा यांची अपूर्ण प्रेमकहाणी यात दाखवण्यात आली होती. या मालिकेत मुख्यतः कोमलिका व्हिलन दाखवण्यात आली होती. मात्र तिच्यानंतर अनुरागशी लग्न करणारी अपर्णा व्हिलन बनते. अभिनेत्री गीतांजली टिकेकर हिचं या भूमिकेसाठी खूप कौतुक झालं होतं.
अपर्णा या व्यक्तिरेखेने गीतांजली टिकेकर हे घराघरात पोहोचली. याशिवाय तिने 'इस प्यार को क्या नाम दूं?... एक बार फिर' मध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. तिने 2002 मध्ये 'क्या हादसा क्या हकीकत' या मालिकेतून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. ती 'जर्सी नंबर 10' मध्येही दिसली आहे. याशिवाय तिने 'तेरे लिए'मध्येही काम केले होते. २००२ ते २०२२ इतका मोठा काळ गीतांजलीने मालिकांमध्ये काम केलं.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर गीतांजलीने 'कसौटी जिंदगी की'चा को-स्टार सिकंदर खरबंदासोबत लग्न केलं. लग्नापूर्वी दोघांनी जवळपास अडीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव शौर्य आहे. त्यांचा जन्म 2008 साली झाला.
गीतांजली सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत. तिचे इंस्टाग्राम वरचे फोटो पाहून चाहते म्हणतात की 23 वर्षांत ती अजिबात बदलली नाही. ती अजूनही तितकीच सुंदर दिसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.