महेश कोठारे यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'पछाडलेला'. या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. या चित्रपटात भरत जाधव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटातील इनामदार भुसनळे आणि त्याचा मालक मालक करणारा कारकून आजही प्रेक्षकांच्या छाप पाडून आहे. या दोघांसोबतच चित्रपटात भाव खाऊन गेला तो बाबा लगीन म्हणणारा बाब्या. या बाब्याच्या लग्नासाठी सुरू असलेल्या धडपडीवर अवलंबून असलेला हा चित्रपट. मात्र हा वेडा बाब्या महेश कोठारेंना भेटला तरी कुठे?
'पछाडलेला' चित्रपटात अभिनेता अमेय हुनसवाडकर याने बाब्याची भूमिका साकारली होती. अमेयने नुकतीच इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार या सेगमेंटला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'सुलोचना ताईंची पंच्याहत्तरी होती आणि मी स्टेजवरच उभा होतो. महेश कोठारे आले आणि सुलोचना ताईंना शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हणाले मी असा असा चित्रपट करतोय त्यासाठी मुलगा मिळत नाहीये. सुलोचना ताईंनी माझ्याकडे हात केला आणि म्हणाल्या, हा चालतोय का बघ. महेश सरांनी मला विचारलं, तुला चालेल का? मी हो म्हणालो. ते म्हणाले ठीक आहे उद्या ऑफीसमध्ये ये. मी गेलो. '
तो पुढे म्हणाला, 'माझी ऑडीशन झाली. त्यांनी मला वाकडं तिकडं तोंड करायला सांगितलं. फोटो काढले. सगळं ठरलं. थेट कोल्हापूरला शूटिंग. पहिल्याचं दिवशी शूटिंगला गेलो तर भरत जाधव समोरून हाय करतायत. श्रेयस तळपदे हॅलो म्हणतोय. मी घाबरलोच. पण शूटिंग झालं. मी घाबरण्याच्या नादात वाक्य चुकवली. नंतर जेव्हा चित्रपट हिट झाला तेव्हा माझं रस्त्यावर पाणीपुरी, शेवपुरी खाणं बंद झालं. कारण मला लोक ओळखायला लागले होते. लोक मला टपल्या वगरे मारून जायचे. त्यांना वाटायचं मी खरंच वेडा आहे. एकदा दोनदा समोरच्या व्यक्तीने मला विचारलंदेखील की अजूनही तुझे उपचार सुरू आहेत का म्हणून. पण या बाबा लगीनची फळं मी अजून चाखतोय असं म्हणेन.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.