Appacha Vishay Lay Hard: 'अप्पाचा विषय हार्ड' कोणी केला? कोण आहे या व्हायरल गाण्याचा गीतकार आणि गायक

Appacha Vishay Lay Hard Hai Song Writer- Singer: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'अप्पाचा विषय हार्ड' या गाण्याचा गीतकार आणि गायक कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
appacha vishay lay hard
appacha vishay lay hardesakal
Updated on

Appacha Vishay Lay Hard Viral Video: सोशल मीडिया हे करमणुकीचं एक साधन आहे. टिक टॉक बंद झाल्यापासून अनेकांनी इंस्टाग्राम रिल्सवर आपला मोर्चा वळवला. दररोज वेगवेगळ्या विषयांवरील, गाण्यांवरील हजारो व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात. त्यातील अनेक गाणी नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होतात. ही गाणी ट्रेंडिंग झाली की नेटकरी त्यावर निरनिराळ्या रिल्स बनवतात. गुलाबी साडी असो किंवा झीन टपाक डम डम सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच भरवसा नाही. आता असंच एक गाणं नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होतंय ज्यावर छोट्यांपासून मोठे सगळेच रिल्स बनवताना दिसत आहेत. ते गाणं म्हणजे 'आप्पाचा विषय लय हार्ड आहे'. हे गाणं सध्या सोशल मीडिया गाजवतंय, पण हे गाणं कुणी लिहिलंय तुम्हाला ठाऊक आहे का?

या गाण्यावर वृद्ध व्यक्तींपासून चिमुकल्यांपर्यंत सगळेच रिल्स बनवत आहेत. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचे बाहेर लय लाड आहे' असे शब्द असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. या गाण्यावर अनेक रिल्स व्हायरल झाले आहेत. एका व्हायरल रिलमध्ये एक शेतकरी वृद्ध व्यक्ती एटीएम मधून काढलेले पैसे मोजताना दिसत आहेत. तर दुसऱ्या रीलमध्ये वृद्ध काका चालत येत आहेत तर त्यांच्या डोक्यावर काकूने छत्रीने पकडली आहे. काका एखाद्या मोठ्या नेत्याप्रमाणे तिला छत्री नीट पकडायला सांगत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्यासोबत या गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. असे अनेक व्हिडिओ या गाण्यावर बनवण्यात आले आहेत.

कुणी लिहिलंय हे गाणं?

मिळालेल्या माहितीनुसार, युट्युबवर वरदान या नावाने अकाउंट असलेल्या एका तरुणाने हे गाणं लिहिलं आहे आणि तोच या गाण्याचा गायक देखील आहे. हे गाणं त्याने एका रॅपच्या रूपात लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर या गाण्याच्या असंख्य रिल्स लोकांनी बनवल्या आहेत. प्रत्येक रिल्सवर लाखो व्ह्यूज असून हे गाणं अनेक युजर्सच्या पसंतीस उतरलं आहे.

appacha vishay lay hard
Siddharth Jadhav: आम्ही एकत्रच! सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; तो व्हिडिओ ठरला कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.