Stree 2: 'स्त्री २' मध्ये लाल साडीच्या पदराआड नेमका कोणाचा चेहरा आहे? ती श्रद्धा कपूर नाही तर...

Who Is New Stree In Stree 2: कोण आहे 'स्त्री २' मध्ये दिसणाऱ्या लाल साडीतल्या भुताची भूमिका करणारी अभिनेत्री? वाचा नाव
stree 2
stree 2esakal
Updated on

लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने एक सिक्वेल कसा असावा याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. शुक्रवारपासून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतोय. सोशल मीडियावर या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होतंय. मुख्य कलाकारांसोबत चित्रपटात कॅमिओ करणाऱ्या अक्षय कुमारचंदेखील प्रेक्षक कौतुक करत आहेत. मात्र या चित्रपटात लाला साडीतल्या भुताची भूमिका कोणी साकारली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

चंदेरी गावात आता स्त्री कोणत्याही पुरुषाला उचलून घेऊन जात नाही. ती आता चंदेरी गावाची रक्षक बनली आहे. मात्र आता गावात सरकटाची दहशत आहे. त्याच्याशी लढण्यासाठी स्त्री सगळ्यांची मदत करते. 'स्त्री २' च्या शेवटी श्रद्धा राजकुमार रावला तिचं नाव सांगताना दिसते. मात्र प्रेक्षकांना ते ऐकू येत नाही. मात्र याचा खुलासा नक्कीच झाला आहे की चित्रपटात भुताच्या भूमिकेत दिसणाऱ्या लाला साडीतील भूमिका कुणी केली आहे. 'स्त्री'मध्ये लाल साडीतील भुताची भूमिका 'गंदी बात' फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने केली होती. आता 'स्त्री २' साठी ही अभिनेत्री बदलण्यात आली आहे. त्या लाल साडीच्या पदरामागचा चेहराही बदलला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्त्री 2' च्या क्लोजिंग क्रेडिट्समध्ये दाखवण्यात आलं आहे की अभिनेत्री भूमी राजगोरने चित्रपटात नवीन 'स्त्री' ची भूमिका साकारली आहे. भूमी राजगौर ही गुजराती अभिनेत्री आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी ती कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने कियारा अडवाणीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

stree 2
Stree 2 Box Office Day 2: 'स्त्री २'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; दोन दिवसात किती केली कमाई? बजेट वाचून चकीत व्हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.