छोट्या पडद्यापासून मोठा पडदा गाजवणारे मराठी अभिनेते अतुल काळे यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. त्यांनी रंगभूमीवरही आपली छाप पाडलीये. अतुल आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची चांगली मैत्री आहे. महेश हे अतुल यांच्यासाठी गुरूप्रमाणे आहेत. मात्र एक वेळ अशी आली जेव्हा अतुल यांनी महेश यांच्या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांनी का घेतला याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अतुल यांनी काही दिवसांपूर्वी मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना अतुल म्हणाले, 'आम्ही खूप छान काम केलं. आमचं बॉण्डिंगदेखील छान होतं. पण काय असतं एका पॉईंटनंतर आपण कितीही म्हटलं तरी मोठ्या झाडाच्या छायेखाली छोटं झाड कधीच वाढत नाही. मला असं वाटलं की प्रयत्न करूया आपण. फक्त असिस्टंट डायरेक्टर बनण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी मी इंडस्ट्रीत आलो नव्हतो. ते करता आलं असतं. असिस्टंट असणं ही अपमानाची गोष्ट नाहीये पण तू स्वतः काही करणार आहेस की नाही? मला माहीत होतं हे खूप कठीण असणार आहे. कारण एवढा मोठा कॅम्प सोडून एकट्याने उभं राहणं हे सोपं नव्हतं. आम्ही लालबाग परळ करत होतो तेव्हा मांजरेकरांना थोडं कानावर आलेलं की हा सोडून जाणार आहे वगरे. पण तो काळ खूप कठीण होता. '
ते पुढे म्हणाले, 'ते फक्त माझ्यासाठी माझे गुरू नव्हते तर त्यांचं आणि माझं बॉण्डिंग वेगळं होतं. ते होतंच गुरूला वाईट वाटतं. की हा का गेला? आणि त्या वेळेला काही गोष्टी त्यांच्यापर्यत चुकीच्या पोहोचवल्या गेल्या. वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आल्या. पण नंतर ते सगळं नीट झालं. नंतर आम्ही एकत्र कामंही केलं. अजूनही मी त्यांच्या संपर्कात आहे. पण माणसाला कधी ना कधी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं.' अतुल यांनी 'जीवाची होतिया काहिली', 'माझा होशील ना' सारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तर 'बाळकडू', 'संदूक' यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.