म्हणून कलर्सने घेतला 'बिग बॉस मराठी ५' अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय; रितेश देशमुख ठरलाय कारण?

Why Bigg Boss Marathi 5 Ending In 70 Days: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता त्यामागील अनेक कारणं समोर येत आहेत.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा कलर्स मराठीवरील कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांचा असणारा हा खेळ आता ७० दिवसातच संपणार आहे. खरं तर हा सीझन इतर चार सीझनपेक्षा जास्त गाजला. या सीझनमध्ये घरात कलाकारांनी कल्ला केला आणि बिग बॉसने त्यांना फैलावर घेतलं. कार्यक्रमाचा होस्ट बदलला आणि त्याचा कार्यक्रमाला फायदाच होताना दिसला. असं असताना प्रेक्षकांची कार्यक्रमाला पसंती मिळत असताना अचानक वाहिनीने कार्यक्रम अर्ध्यावरच संपवण्याचा निर्णय घेतला. आता त्यामागची काही महत्वाची कारणं समोर येत आहेत.

हिंदी बिग बॉसचा फटका

या सीझनचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र अचानक हा सीझन बंद करण्याचं कारण काय? याचं सगळ्यात मोठं कारण समोर येतंय ते म्हणजे हिंदी बिग बॉसची एंट्री. सलमान खान याच्या 'बिग बॉस १८' ला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉसकडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे हिंदी बिग बॉसचा टीआरपी कमी होईल अशी भीती असल्याने हा सीझन वेळेआधीच संपवला असल्याचं बोललं जातंय. सलमानच्या बिग बॉसमुळे हा सीझन संपवला असल्याचं बोललं जातंय त्यामुळे नेटकरीदेखील संतापले आहेत. हिंदीपुढे मराठी झुकलंय असं बोललं जातंय.

रितेशला शूटिंगला वेळच नाही

यामागे आणखीही काही कारणं सांगितली जात आहेत. रितेश देशमुखला सध्या बिग बॉसच्या शूटिंगला वेळ नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच या आठवड्यात भाऊचा धक्का झाला नाही. तर यासोबतच हा सीझन अजूनपर्यंत खूप चांगला सुरू आहे. त्यामुळे पुढे दिवस वाढवून त्याची टीआरपी कमी करण्यापेक्षा चांगली टीआरपी असतानाच तो संपवलेला चांगला असं वाहिनीचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही लवकर कार्यक्रम बंद करतोय असं स्पष्टीकरण वाहिनीतील काही व्यक्तींनी दिलं आहे. ही सगळी कारणं असल्याने यावेळेस बिग बॉसच्या घरातील १०० दिवसांचा पायंडा मोडून आता ७० दिवसात हा खेळ संपवला जाणार आहे.

bigg boss marathi 5
New Serial: टीआरपीसाठी केदार शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! बिग बॉस संपल्यावर एक दोन नाही तर या चार मालिका येणार भेटीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.