लोकप्रिय बॉलिवूड कलाकार कादर खान यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेले कादर खान यांचा आज स्मृतिदिन आहे. कादर खान यांचं प्रत्येक पात्र अजरामर ठरलं. त्यांच्याशिवाय ते पात्र इतर कुणीही करू शकणार नाही असं वाटावं इतका त्यांचा अभिनय उत्कृष्ट होता. इंडस्ट्रीमध्ये कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री सर्वश्रुत होती. अनेक वर्ष ते दोघे एकमेकांचे जिगरी यार होते. कित्येक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. मात्र असं काय घडलं ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला?
स्वतः कादर खान यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. अमिताभ आणि कादर खान एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होते. त्यापूर्वीच अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते राजीव गांधी यांच्या जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. चित्रपटाच्या सेटवर गेल्यावर दाक्षिणात्य निर्मात्याने कादर खान यांना विचारलं, 'तुम्ही सर जींना भेटलात का?' त्यावर ते म्हणाले, 'कोण सर जी?' तो म्हणाला, 'तुम्हाला सर जी माहीत नाहीत? अमिताभ बच्चन'. कादर खान म्हणाले, 'मी त्यांना अमित म्हणतो.' त्यावर तो म्हणाला, 'नाही यापुढे त्यांना सर जी म्हणा कारण ते आता मोठे माणूस झाले आहेत.'
त्यानंतर कादर खान सेटवर गेले. समोरून अमिताभ आले. पण कादर यांनी त्यांना सर जी म्हणून हाक मारली नाही. त्यानंतर कादर खान यांना 'खुदा गवाह' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. याशिवाय ते 'गंगा जमूना सरस्वती' या चित्रपटाचं देखील लेखन करत होते. मात्र त्यांना त्यातूनही बाहेर करण्यात आलं. त्यानंतर कादर खान कधीही अमिताभ यांच्याशी बोलायला गेले नाहीत. त्यांची मैत्री तिथेच तुटली. त्या दोघांनी 'अमर अकबर एंथनी’, ‘दो और दो पांच’ , ‘कालिया’, ‘सत्ते पे सत्ता’ (1982), ‘कुली’, ‘शहंशाह’, ‘अग्निपथ’ सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.