सध्या कलर्स मराठीवरील ''बिग बॉस मराठी ५' हा कार्यक्रम प्रचंड गाजतोय. या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला जणू वेड लावलंय. या सिझनमध्ये अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. यात सगळ्यात जास्त होते ते इन्फ्लुएन्सर. यात अंकिता वालावलकर, धनंजय पोवार यांसारख्यांचा समावेश आहे. मात्र घरात आलेला सगळ्यात जास्त गाजणारा इन्फ्लुएन्सर म्हणजे सुरज चव्हाण. सूरजला पाहून त्याचे चाहते प्रचंड खुश झाले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देतोय. त्याचा झापून झुपक गुलिगत धोका सगळ्यांनाच प्रचंड आवडला. मात्र त्याची या कार्यक्रमासाठी निवड नक्की कशी झाली याबद्दल आता वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी माहिती दिली आहे.
कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच ‘नवशक्ती’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये कास्टिंग कशी झाली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबद्दल सांगताना ते म्हणाले, 'करणारी जी लोकं आहेत, त्यांनी ते नाव आमच्यासमोर आणलं. थोडसं वेगळं नाव आहे ते, आधी त्याला घ्यावं की नाही असा त्या मंडळींचा प्रश्न होता. पण मी, सुषमा, राजेश आम्ही ठाम होतो. कारण त्याच्यामध्ये साधेपणा आणि आपलेपणा आहे. मला असं वाटतं की मी कुठे काय काम करत होतो आणि जर आज मी या पदावर पोहचतोय तर तो हक्क प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे.'
ते पुढे म्हणाले, 'मी ज्यावेळी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो, त्यावेळी त्याच्याकडे पाहिल्यावर तो खरा असल्याचे वाटला होता. आज लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत, आनंद आहे. मला वाटतं की सूरज आयुष्यभर माझ्या खूप जवळ राहील.' सुरजला प्रेक्षकांचा पाठिंबा आहे. मात्र आता झालेल्या वाइल्ड कार्ड एंट्री संग्राम चौगुलेमुले घरातील समीकरणं बदलणार असल्याचं दिसतंय. आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.