Lawrence Bishnoi Confession In Salman Khan Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला यापूर्वी अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने जीवे मारण्याची धमकी दिली. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण आणखी चिघळलं. बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतल्यानंतर सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली. जोधपूरमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानने केलेल्या काळवीटाच्या हत्येनंतर लॉरेन्स त्याला धमकी देऊ लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबासोबतच पोलीसदेखील चिंतेत आहेत. परंतु, काळवीटाच्या हत्येमुळे लॉरेन्स सलमानच्या मागे लागला नाहीये. एका स्टेटमेंटमध्ये लॉरेन्सने स्वतः कबुल केलं होतं की त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली त्यामागचं कारण वेगळंच आहे.
काळवीटाच्या हत्येप्रकरणी काही जण सलमानला त्याने जाऊन बिष्णोई समाजाची माफी मागायला हवी असं सांगतायत तर काही जण ते दोघेही प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहेत असं म्हणतायत. मात्र अशातच आता एबीपी वाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईंचा तो जबाब समोर आला आहे ज्यात तो सलमानला धमकी का देतोय. यासगळ्यामागे काळवीट हत्या हे कारण नाहीये. तो फक्त बिष्णोई समाजात प्रसिद्ध होण्यासाठी हे सगळं करत आहे.
लॉरेन्स दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हणाला, 'वासुदेव इराणी यांच्या हत्येप्रकरणी मला अटक करून जोधपूरला आणण्यात आले, तेथे मला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टातून बाहेर पडत असताना त्याच कोर्टात सलमान खानही एका तारखेला आला होता. सलमान खानने काळवीटाची शिकार केल्यामुळे आणि कोर्टाकडून त्याला शिक्षा होत नसल्याने मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मी सगळ्यांसमोर त्याला धमकी दिली. मी हे फक्त प्रसारमाध्यमांमध्ये दिसण्यासाठी आणि बिश्नोई समाजात माझं नाव मोठं करण्यासाठी केलं. सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मला अटकही झाली होती.'
लॉरेन्सने हे स्टेटमेंट ३० मार्च २०२१ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.