कलाकार ठरले, घोषणा अन् वादही झाले... पुढे काय? महेश मांजरेकरांचा 'तो' महत्वकांक्षी चित्रपट झाला डब्बाबंद?

Mahesh Manjrekar Big Budget Movie : लोकप्रिय मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटाचा आता कुठेच पत्ता नाहीये. तो चित्रपट आता बंद झाला का असा प्रश्न उपस्थित उपस्थित करण्यात येत आहे.
mahesh manjrekar
mahesh manjrekar esakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला. कर्करोगासारख्या मोठ्या आजाराशी लढा देत त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. नुकतंच विकी कौशल याच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. मात्र त्यासोबतच सोशल मीडियावर चर्चा रंगली ती महेश मांजरेकर यांच्या त्या ऐतिहासिक चित्रपटाची ज्याची घोषणा जवळपास २ वर्ष आधी करण्यात आली होती. त्या चित्रपटाचं नेमकं काय झालं असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित केला जात आहे.

वेडात मराठे वीर दौडले सात

छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्म बलिदानाने इतिहास अजरामर केला आहे. या सात मावळ्यांच्या शौर्यावर आधारित एक चित्रपटाची महेश मांजरेकरांनी घोषणा केली होती. त्या चित्रपटाचं नाव होतं 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची २०२२ साली घोषणा करण्यात आली. या चित्रपटासाठीच्या कलाकारांचे चेहरेही दाखवण्यात आले.

शूटिंगला ब्रेक

या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, सत्या मांजरेकर आणि विराट मडके हे मुख्य भूमिकेत दिसणार होते. तर छत्रपतींच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसणार होता. या कलाकारांचे फर्स्ट लूकदेखील समोर आले होते. मात्र त्यानंतर या चित्रपटाबद्दल कोण्हीती हालचाल दिसून आली नाही. २०२३च्या दिवाळीत हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याबद्दलही कोणतीही माहिती निर्मात्यांकडून देण्यात आली नाही. यापूर्वी अभिनेते त्यांचे जिममधील व्हिडिओ शेअर करत असत. मात्र त्यांनीही ते बंद केलं. चित्रपटाची ५० टक्के शूटिंग झाल्यानंतर शूटिंगला ब्रेक लावण्यात आला.

वादाला तोंड

कलाकारांमधील सत्या मांजरेकर याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय कुमारला देखील नाकारलं होतं. त्यात आणखी एक भर म्हणजे अक्षयच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बल्बमुले वेगळ्याच वादाला तोंड फुटलं होतं. छत्रपतींच्या काळात वीज नव्हतीच त्यामुळे हा बल्ब कुठून आला असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला होता.

चित्रपट नेमका कधी येणार

या चित्रपटाचं कथानक हे बशीर मोमीन (कवठेकर) लिखित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकावर आधारित आहे आणि कुरेशी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्यानंतर या चित्रपटाबद्दल कुठेही वाच्यता करण्यात आलेली नाही. आता हा चित्रपट नेमका कधी येणार याकडे अजूनही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

mahesh manjrekar
जेठालालला भेटायला आला त्याचा सगळ्यात मोठा फॅन, ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्याबद्दल मिळालं सर्वात बेस्ट गिफ्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.