तब्बूवर प्रेम असूनही नागार्जुनने तिच्याशी लग्न का केलं नाही? पत्नी म्हणालेली- फिल्म इंडस्ट्रीतली घाण...

Nagarjuna Akkineni Birthday: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन अक्किनेनी याचा आज ६५ वा वाढदिवस आहे. नागार्जुन आणि तब्बू जवळपास १० वर्ष रिलेशनमध्ये होते.
nagarjuna akkineni
nagarjuna akkineni esakal
Updated on

आपल्या अभिनयाने आणि लूक्सने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता म्हणजे नागार्जुन. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही त्याचे चाहते आहेत. आज नागार्जुनचा ६५ वा वाढदिवस आहे. यावयातही फिट असणारा नागार्जुन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत अभिनेत्री अमला हिच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र त्यानंतर त्याची भेट तब्बूशी झाली. ते तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र असं असूनही नागार्जुनने अभिनेत्रीसोबत लग्न का केलं नाही...

सिसिंद्रीच्या शूटिंगदरम्यान तब्बू आणि नागार्जुन जवळ आले. इतर वेळीही ते एकत्र असायचे. नागार्जुनने तब्बूला एक बंगलाच गिफ्ट केला होता, जो त्याच्या हैदराबादमधील घराच्या अगदीच शेजारी होता. असं म्हटलं जातं की ते दोघे लिव्ह इन मध्येही राहत होते. त्यांनी अनेक वर्ष डेट केलं. मात्र १० वर्ष उलटूनही नागार्जुन तब्बूशी लग्न करायचं नाव घेत नव्हता. नागार्जुन आपल्या पत्नीला सोडायला तयार नव्हता. ही गोष्ट जेव्हा तब्बूच्या लक्षात आली तेव्हा तिने त्याच्याशी ब्रेकअप केलं. मात्र नागार्जुनच्या पत्नीने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

काय म्हणालेली नागार्जुनची पत्नी?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुनची पत्नी अमला म्हणालेली, 'माझा नागार्जुन आणि तब्बू यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या घरात काय होतं याची काळजी बाकीच्यांनी करायची गरज नाही. आता तुम्ही विचाराल, की याबाबत मी नागार्जुनाशी बोलली आहे का; तर आधीच सांगते, कधीच नाही! माझं घर हे एखाद्या मंदिराप्रमाणे पवित्र आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील कोणतीही घाण मी या घरात येऊ देत नाही. खासकरुन असे गॉसिप. अशा प्रकारच्या चर्चा मी घरात करतही नाही आणि करुही देत नाही. तिला दुःख झालं असेल, हे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही त्याबाबत कधीही बोलत नाही.'

नागार्जुनसोबतचं नातं तुटल्यानंतरही तब्बूने त्याचा परिणाम तिच्या कामावर कधीही होऊ दिला नाही. तिने बॉलिवूडमध्ये आपली मुळं आणखी घट्ट रोवली. तिची प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीला पात्र ठरते. तर नागार्जुनही दाक्षिणात्य चित्रपटात काम करताना दिसतो.

nagarjuna akkineni
Pushpa 2 Release Date: आता फक्त दिवस मोजा! 'पुष्पा २'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी थिएटरमध्ये येणार पुष्पराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.