दारापुढे, पाटापुढे झटपट... रात्री २ वाजता ऐकलेल्या व्हिडीओचं यशराज मुखातेने बनवलं रांगोळी रॅप, तुम्ही ऐकलंत का?

Yashraj Mukhate New Reel On Rangoli: लोकप्रिय संगीत निर्माता आणि संगीतकार यशराज मुखाते याचा आणखी एक रॅप सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
yashraj mukhate new song
yashraj mukhate new song esakal
Updated on

'रसोडे मे कौन था' या गाजलेल्या रॅपमधून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा लोकप्रिय संगीतकार यशराज मुखाते याने आपल्या जवळपास सगळ्याच रॅप मधून चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं. त्याचा प्रत्येक रॅप जोरदार गाजला. आता पुन्हा एकदा यशराजने आणखी एक रॅप प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओवरून रॅप तयार करण्यासाठी यशराज प्रसिद्ध आहे. आता रात्री २ वाजता पाहिलेल्या व्हिडिओचं त्याने रॅप बनवलंय. मुख्य म्हणजे हे रॅप रांगोळीशी संबंधित आहे आणि ते पाहून नेटकरीही त्याच्यावर फिदा झालेत. नेटकरी त्याच्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचं यशराजने रील बनवलं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रांगोळीचे साचे विकत आहे. रांगोळी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळी साच्यांमध्ये रंग भरून तो रांगोळी काढून दाखवत आहे. छापे काढत आहे. यात तो बरंच काही बोलताना दिसतोय. हेच ऐकून यशराजने त्याचं रॅप बनवलं आहे. दारापुढे पाटापुढे, देवापुढे, देवघरात, आतमध्ये, बाहेर कुठे काढत बसा रांगोळी' अशा या गाण्याच्या ओली आहेत. हे ऐकताना नेटकऱ्यांना वेगळीच मजा येतेय. त्याचा हा रॅप आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही तासातच या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत.

यशराजच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, 'तुझं गाणं ऐकण्यासाठी भाषा येण्याची गरज नाही. वाइब आहे भाई.' आणखी एकाने लिहिलं, 'काही कळलं नाही पण मजा खूप आली.' दुसऱ्याने लिहिलं, 'आता डोक्यात नुसतं हेच गाणं फिरतंय.' आणखी एकाने लिहिलं, 'अभिनंदन व्हायरल रील झालंय.' त्याचं हे रील चांगलंच व्हायरल होतंय.

yashraj mukhate new song
प्रदर्शनाआधीच भिडले 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३'; टी सिरीजची CCI कडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.