'ये रे ये रे पैसा ३' मध्ये कोण कोण असणार? समोर आली स्टारकास्ट; तेजस्विनी, उमेशसोबत हास्यजत्रामधील अभिनेत्रीही झळकणार

Yere Yere Paisa 3: 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला आहे. या चित्रपटात काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
ye re ye re paisa 3
ye re ye re paisa 3 sakal
Updated on

Marathi Movie Yere Yere Paisa 3 Star Cast : 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला आहे. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांच्या 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका होत्या. पैशाच्या मागे पाळणारे तीन मित्र आणि त्यांचे अतरंगी कारनामे, येणारी संकटं आणि त्यातून काढला जाणारा मार्ग हे सगळं आणि कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना आवडली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे.

आज १० जुलै रोजी मुंबईत 'ये रे ये रे पैसा ३' या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. आता या चित्रपटात काही नवीन चेहरेही दिसणार आहेत. 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा 2' या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. आधीच्या चित्रपटातील कलाकार आता तिसऱ्या भागात काय कल्ला करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तिसऱ्या भागात 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तील अभिनेत्री वनिता खरातचीदेखील वर्णी लागली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता आता नव्या चित्रपटात दिसणार आहे. वनितासोबतच चित्रपटात नागेश भोसले, जयवंत वाडकरदेखील दिसणार आहेत. त्यांच्यासोबत संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, आणि आनंद इंगळे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

ye re ye re paisa 3
Ashi Hi Banwa Banwi 2: 'नवरा माझा नवसाचा २' नंतर 'अशी ही बनवाबनवी'चा दुसरा भाग येणार? सचिन पिळगावकरांनी स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.