Marathi Serial: झीवरील नवी मालिका आहे स्टार प्रवाहच्या मालिकेची कॉपी? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात

Zee Marathi New Serial Savlyachi Janu Sawali Concept: छोट्या पडद्यावर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र त्या विषयावर नेटकरी नाराज आहेत.
savlyachi janu savali
savlyachi janu savaliesakal
Updated on

छोट्या पडद्यावर आता नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. कलर्स मराठीवर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. तर झी मराठीवरील काही मालिकांनी देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अशातच झी मराठीने एका नव्या मालिकेची घोषणा केली. 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरू होणार आहे. या मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची निराशा झाली आहे. हा प्रोमो पाहून ही मालिका स्टार प्रवाहावरील एका मालिकेची कॉपी असल्याचं बोललं जातंय.

'सावल्याची जणू सावली' या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री वीणा जगताप आणि अभिनेत्री सुलेखा तळवलकरदेखील आहेत. मात्र या मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी या मालिकेची तुलना स्टार प्रवाहावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेशी करत आहेत. 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपा हीचा रंग सावळा दाखवण्यात आला होता. सौंदर्या इनामदार यांना सावळा रंग आवडत नसल्याने त्या तिचा सून म्हणून स्वीकार करण्यास नकार देतात. मात्र पुढे दीपा त्यांचे विचार बदलते. या मालिकेत एकूणच सावळ्या रंगाशी होणारा भेदभाव दाखवण्यात आला होता. आता 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतही तशीच कन्सेप्ट आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

savlyachi janu savali
savlyachi janu savaliesakal

या मालिकेतही मुख्य अभिनेत्री सावळ्या रंगाची दाखवली आहे. त्यात एक श्रीमंत हिरो आणि त्याची फक्त सुंदर वस्तू किंवा माणसं आवडणारी आई दाखवण्यात आली आहे. ही संपूर्ण कन्सेप्ट सेम असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर नेटकरी आता प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'रंग माझा वेगळाचा रिमेक आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'नको बाई आत्ता परत ती डोके दुखी,रंग माझा वेगळा.' तिसऱ्याने लिहिलं, 'अजून एक दीपा येतेय.' आणखी एकाने लिहिलं, ;हा तिसरा रिमेक आहे. कार्तिक पौर्णिमा हिंदीमध्ये, रंग माझा वेगळा आणि आता ही सिरीयल.' एकाने लिहिलं, 'कास्टिंग चांगलं आहे पण कॉन्सेप्ट रिपीट झाला आहे.'

तर काही नेटकरी आधी मालिका सुरू होऊद्या मग ठरवू असं म्हणत आहेत. काही प्रेक्षकांनी मालिकेची बाजू घेतली आहे. कन्सेप्ट काहीतरी वेगळी असेल असं काही नेटकरी म्हणताना दिसत आहेत.

savlyachi janu savali
विनोदातून विचार करायला लावणारं 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; या दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.