ऑलिम्पिकसारखी मोठी स्पर्धा म्हटली की वाद आलेच. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तर अगदी उद्घाटनाच्या समारंभापासून अनेक ठिकाणी टीकेचा सूर लावला जातो आहे.
इमान खलिफे आणि अँजेला करिनीच्या निमित्ताने ऑलिम्पिकमधल्या खेळाच्या सामन्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या वादात जगभरातील राजकारण्यांनीही उड्या घेतल्या आहेत.