पुणे: हल्ली प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं असतं. काळासोबत स्वतःला अपडेट ठेवणं, कामाच्या ठिकाणी अधिक चांगली पोस्ट मिळावी म्हणून सतत प्रयत्न करणं, पगारवाढीसाठी प्रयत्न करणं, कोणाच्यातरी नजरेत स्वतःला उंचावण्यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक नात्याला न्याय देता यावा यासाठी क्षमतेपलिकडे जाऊन धडपड करणं... सगळ्याच पातळ्यांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात सगळंच burnout होऊन एकही गोष्ट धड होत नाही..
खरं तर आपल्यातील अनेकांच्या बाबतीत हे घडत असतं पण असं झाल्यावर काय करायचं असतं..? थांबलो तर संपलो अशा वाक्यांनी आपलं डोकं व्यापलेलं असताना खरंच थांबता येणं शक्य आहे का..? यामागचं मानसशास्त्र काय सांगतं? संशोधन काय सांगतं? आणि या सगळ्या एकमेकांमध्ये अडकलेल्या गोष्टींचा गुंता कसा सोडवायचा....?