उषा लोकरे
टँगी फ्रूट सॅलड
वाढप
४ ते ६ व्यक्तींसाठी
साहित्य
बिया काढलेल्या कलिंगडाचे १ कप चौकोनी तुकडे, बिया काढलेल्या खरबुजाचे अर्धा कप तुकडे, अर्धा कप अननसाचे तुकडे, १५ ते २० काळी द्राक्षे, १५ ते २० ऑलिव्हचे तुकडे, १० ते १५ कोवळी पुदिन्याची पाने.
ड्रेसिंगसाठी - तीन टेबलस्पून मध, ३ चमचे लिंबाचा रस, मिरपूड , मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल,
फेटा चीजसाठी - अर्धा कप पनीर बारीक किसून, ३ टेबलस्पून चक्का किंवा घट्ट दही, मीठ व पिठीसाखर चवीनुसार, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा व्हिनेगर.
कृती
फेटा चीज करण्यासाठी पनीर, मीठ, साखर व व्हिनेगर एकत्र करून चांगले फेटून मिश्रण एकजीव करावे. एका प्लेटमध्ये त्याचा जाडसर थर थापून तो फ्रीजमध्ये १ तास सेट करण्यासाठी ठेवावा. नंतर एका बाऊलमध्ये कलिंगड, खरबूज व द्राक्षे ठेवावीत. त्यानंतर पुदिन्याची पाने घालावीत. फेटा चीजचे छोटे गोळे किंवा चौकोनी तुकडे करून सॅलडवर पसरावेत. सॅलडवर मधाचे ड्रेसिंग घालून सर्व्ह करावे.