मृणाल तुळपुळे
ऑलिंपिकदरम्यान तेरा दशलक्ष लोकांना सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोणकोणते खाद्यपदार्थ द्यायचे हे ठरवणे सोपे काम नव्हते. त्यावर कित्येक शेफ्स व त्यांचे सल्लागार अनेक दिवस काम करत होते. बऱ्याच सल्लामसलतीनंतर व आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खास शाकाहारी व व्हेगन मेनू तयार करण्यात आला आहे.