अजय बुवा
ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा चमू पॅरिसला पोहोचतो आहे. गेल्या काही वर्षांतील भारताच्या ऑलिंपिक पदकांची वाढती संख्या पाहता पॅरिसच्या स्पर्धांकडूनही भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमान पदासाठी भारताने तयारी चालविली आहे.
कोणतीही क्रीडा स्पर्धा ही त्या त्या भागातल्या क्रीडा संस्कृतीला पोषक ठरणारी आणि क्रीडाक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना देणारी असते. त्या पार्श्वभूमीवर आताची पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताचे भावी यजमान पद याबद्दल मूळच्या नागपूरकर आणि अगदी मराठमोळ्या असलेल्या केंद्रीय क्रीडा खात्याच्या सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी साप्ताहिक सकाळशी बातचीत केली. त्याचा संपादित अंश....