किशोर पेटकरमनूला पदकांची हॅटट्रिक करता आली नसली, तरी ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला, तसेच एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली आहे..तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूतील महिला नेमबाज मनू भाकरकडून पदकाच्या भरपूर आशा होत्या, तिच्यावर प्रसिद्धीचा झोतही अधिक होता. मात्र प्रत्यक्षात सारे फिस्कटले. भारताच्या एकाही नेमबाजाला टोकियोत पदक मिळाले नाही. भारतीय नेमबाजीतील वाद, रुसवेफुगवे चव्हाट्यावर आले. त्यात युवा नेमबाज मनू भाकरसुद्धा भरडली गेली.समजा त्या अपयशामुळे मनू भाकर कोलमडून गेली असती, तर भारतीय क्रीडाक्षेत्रात कदाचित ती मोठी शोकांतिका ठरली असती. टोकियो ऑलिंपिकच्या वेळेस मनू अवघी १९ वर्षांची होती. तेव्हा झालेल्या पराभवाने येणारी निराशा तिच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होती. बहरण्यापूर्वीच एका उमलत्या गुणवत्तेचा गाशा गुंडाळला जाण्याचा धोका होता. खेळाडूंसाठी अवाजवी अपेक्षांचे दडपण खूपच जड व असह्य असते. आपला देश तर अब्जावधी लोकसंख्येचा. मेहनत, त्याग, समर्पण या साऱ्यांचा विसर पडून क्रीडापटूने चँपियनच व्हावे ही सर्वसामान्य भावना काही वेळा खेळाडूसाठी नुकसानकारक ठरते..ऑलिंपिक पदकासाठी भरारीटोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरला पिस्तुलाने दगा दिला, चार वर्षांची तयारी आणि खडतर परिश्रम मातीमोल झाले. ऑलिंपिकला निघण्यापूर्वीच मनू आणि तिचे नियमित प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यात वितुष्ट आले. टोकियोतील निराशेनंतर मनू सावरली; ते आवश्यकच होते. ती अध्यात्माकडे वळली.भगवद्गीतेतील बहुमूल्य शिकवण तिच्या जीवनात मार्गदर्शक ठरली, असे ती सांगते. अहंभाव व मतभेदांना तिलांजली देत तिने गुरू जसपाल यांचे शिष्यत्व पुन्हा पत्करले. सारे बिंदू पुन्हा जुळून आले. नेमबाजी रेंजवर चित्त आणि नजर फक्त लक्ष्यावरच एकवटली. कष्टाचे चीज झाले.मनू पॅरिस ऑलिंपिक नगरीत हास्याने टवटवीत होऊन आपली ब्राँझपदके मोठ्या अभिमानाने मिरवताना दिसली, समस्त भारतवासीयांच्या ‘आखों का तारा’ झाली. मनूला तिसरे पदक जिंकता आले नसले, तरी ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला, तसेच एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली..कणखर मनोवृत्तीशातोरू नेमबाजी केंद्रावर १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक जिंकल्यानंतर मनूच्या तोंडून निघालेले बोल खूपच उद्बोधक आहेत. ही २२ वर्षीय नेमबाज भगवद्गीतेचा संदर्भ देत म्हणाली, ‘अपना कर्म करो, फल की चिंता मत करो...’ एकदम बरोबर! क्रीडा मैदानावर केवळ फळाची अपेक्षा बाळगून उतरल्यास बहुतांश वेळेस अतिरिक्त दडपण झेपत नाही. शिकवण, अनुभव आणि वयोमानानुसार मनू खंबीर, धाडसी आणि परिपक्व झाली. पूर्ण समर्पणाच्या कणखर मानसिकतेमुळे ऑलिंपिक पदकाची स्वप्नपूर्ती झाली. मनूच्या मागील दोन वर्षांतील कष्टप्रद वाटचालीस तोड नाही. हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले. नंतर गतवर्षी जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुन्हा एकदा तिच्या गळ्यात सोनेरी पदक दिसले. शिवाय आशियाई, विश्वकरंडक, जागतिक अजिंक्यपद, जागतिक विद्यापीठ स्पर्धेत मनूने पदकाचे सातत्य राखले, प्रगल्भ आत्मविश्वासाला तेजस्वी दिशा गवसली आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये केवळ एकच नव्हे, तर लागोपाठ पदक जिंकण्याचा देदीप्यमान आणि अभूतपूर्व जल्लोष झाला. अभिनंदन मनू!(किशोर पेटकर सकाळ माध्यम समूहाच्या दै. गोमन्तकचे क्रीडा वार्ताहर आहेत. ).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.