पुणे - महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेतून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, या योजनेचा उद्या (ता. १७) पुण्यात शुभारंभ होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. महिलांना केवळ १५०० रुपये दिले जात आहेत, अशी टीका करून विरोधकांनी योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते, असा अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.