पारगाव - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजाराचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला असताना सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत काही बँका खिळ मारताना दिसत आहे. महिलांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून बँका मिनिमम बॅलन्स चार्ज, एसएमएस चार्ज, थकीत कर्ज वसुली या नावाखाली परस्पर रक्कम कपात करून घेत आहे. त्यामुळे महिलांना मिळालेल्या तीन हजार रुपयातून अवघे हजार अकराशे रुपयेच हातात मिळत असल्याने महिलांमधुन बँकांच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.