पुणे
Ladki Bahin Yojna: मी मुख्यमंत्री होतो तेव्हा.. लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी केलं शिंदेंना सावध, विरोधकांवर खटाखट टीका
ladki bahini yojana inauguration in pune devendra Fadavis Speech: आणखी काही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. ही खटाखट सारखी नाही तर फटाफट योजना आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
Pune News: आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मुरलीधर मोहोळ इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला.
परकीयांचे आक्रमण जेव्हा होत होते तेव्हा आई जिजाऊने याच पुण्यात सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांना दिली होती. ज्या पुण्यात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आल्या, तिथे ज्योतिबा फुले आणि सावित्री बाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु केली. त्यामुळेच योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून सुरु केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.