पुणे : "देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे २७ आजी-माजी मंत्री माझ्याकडे आहेत. त्यांनीच फडणवीस यांच्या दहशतीची माहिती दिली. फडणवीस कामही करू देत नाहीत आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष बाळगणाऱ्या फडणवीस यांचा खुनशीपणाच आता भाजपच्या मुळावर उठला आहे.' अशा शब्दात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.