Pune: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात आहेत. त्यांच्या शांतता रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमा झाले आहेत. पुण्यातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत 'भावी मुख्यमंत्री'चे पोस्टर झळकले आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
'मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री' असा आशय असलेले पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचं दिसून आलं आहे. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत.