पुणे, ता. २६ : ज्येष्ठ नेते शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण त्यांना मराठ्यांना आरक्षण देता आले नाही. हे आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिले होते, महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही. मनोज जरांगे पाटील हे फडणवीसांच्या विरोधात बोलत असले तरी त्यांचा राग हा व्यवस्थेविरोधात आहे, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.