Pune News: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे ठाम असून त्यांच्या रॅलीचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर रॅलीची सांगता होईल. सकाळी 11 वाजता शांतता रॅली सुरु होईल.
जरांगे यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. मनोज जरागेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहेत. आज दुपारी १२ वाजता शांतता रॅली सारसबाग येथून सुरु होईल. डेक्कनच्या खंडुजी बाबा चौकात संध्याकाळी सहा वाजता रॅलीचा समारोप होईल.