नवी दिल्ली- शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. आगामी विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाबाबत त्या काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज पुण्यात शिवसंग्रामची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेला राज्यातील सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर झाली. तसेच, शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली.
शिवसंग्राम किमान ५ विधानसभा जागा लढवणार आहे असं ज्योती मेटे यांनी जाहीर केलं आहे. शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर चर्चा झाली, याबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आणि कायदेशीर मराठा आरक्षण हे कोणी देईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे, असं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं.