Swayam Talks : ६ ऑक्टोबरला ८ भारी माणसं पुणेकरांच्या भेटीला; 'स्वयं टॉक्स' तर्फे अनोखा ब्रेन बुस्टर!

Swayam Talks : 'स्वयं टॉक्स' ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात ८ मान्यवरांचा विचारमंथन करणारा ब्रेन बूस्टर कार्यक्रम आयोजित करणार आहे. विविध क्षेत्रातील हे तज्ज्ञ, विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतील.
Swayam Talks
Swayam Talks sakal
Updated on

विचार असे हवेत, जे विचार करायला भाग पाडतील. हे विचारमंथन घडवण्यासाठी 'स्वयं टॉक्स' पुणेकरांसाठी आयोजित करत आहे एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम! रविवारी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात बंटरा भवन, बाणेर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

'सकाळ' वृत्तपत्र सहआयोजक आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत-कीर्तिवंत सहभागी होणार आहेत. या मान्यवरांचे विचार तुमच्या विचारांची दिशा पूर्णतः बदलून टाकतील, नवा दृष्टिकोन देतील आणि नवे काही करण्याची प्रेरणा देतील. विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी तसेच पालकांनीदेखील अजिबात चुकवू नये, असा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे पाहुणे तुमच्यासाठी ब्रेन बूस्टर ठरतील हे नक्की!

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक दत्तात्रय वारे, ज्यांनी शिक्षणाचा सरधोपट मार्ग सोडून सुटसुटीत, मजेशीर आणि आनंदी शिक्षणपद्धतीचा फॉर्म्युला  तयार केला. तो अनुसरण्यासाठी राज्यभरातील आणि राज्याबाहेरील शिक्षक त्यांच्या शाळेला भेट देतात. त्यांच्यामुळे ५००० मुलांचे वेटींग लागले. या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे. संपूर्ण जगाची डोकेदुखी झालेल्या काही प्रश्नांवर उत्तर शोधणारे डॉ. राहुल मराठे.

प्लॅस्टिक खाणाऱ्या अळ्यांवर संशोधन आणि कीटकांचा वापर करून ते पर्यावरणपूरक उपाय शोधत आहेत. सखोल अभ्यास आणि नाविन्यपूर्ण विषयात संशोधन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शालू कोल्हे ताई भंडारा- गोंदिया परिसरातील पुरातन तलावांचे जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करत आहेत. त्यांनी आजवर ६३ तलाव जिवंत केले आहेत. १२ राज्यांत ३५० हार्ट क्लिनिकची भव्य चेन उभारणारे तरुण मराठी डॉक्टर रोहित साने, हे आयुर्वेदाचा वापर करून हृदयविकाराच्या रुग्णांना 'संपूर्ण हृदय शुद्धीकरण' ही उपचारपद्धती यशस्वीपणे देत आहेत.

Swayam Talks
Swayam Talks: महाराष्ट्राची नवी 'सकाळ' 'स्वयं टॉक्स' सोबत ! तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी चळवळ आता महाराष्ट्राच्या ११ शहरांत!

'आयुर्वेदातील शास्त्रज्ञ' या पुरस्काराने ते गौरवले गेले आहेत. महाराष्ट्र अंडर १९ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पत्रकार, समालोचक आणि आता सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून परिचित असलेले सुनंदन लेले, ज्यांच्याकडे सचिनसकट क्रिकेटविश्वातील रोचक किस्स्यांनी भरलेली पोतडी आहे. तसेच भूषण कोरगांवकर हे बहुशैलीतील, बहुभाषिक लेखक, संशोधक, दिग्दर्शक, अनुवादक, शिक्षक, नाट्यनिर्माते आणि गीतकार आहेत.

लावणी कलाकारांना माणुसकीने वागवत त्यांच्या जीवनावर भूषण यांनी सखोल अभ्यास आणि लेखन केले आहे. ते एक हरहुन्नरी लेखक आहेत. 'बैठक' फाउंडेशनचे  मंदार कारंजकर व दाक्षायणी आठल्ये हे दाम्पत्य ज्यांनी तळागाळातील सामान्यांपासून ते सर्व स्तरातील रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लावली. तेदेखील स्वरमिठास घेऊन आपल्या भेटीस येणार आहेत. या सर्व मान्यवरांशी संवाद साधणार आहेत डॉ. उदय निरगुडकर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत मिलिंद कुलकर्णी. 

२०१४ पासून 'स्वयं टॉक्स' तर्फे असे मेंदूला टॉनिक देणारे कार्यक्रम ठीकठिकाणी होत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी विशेषतः मराठी भाषेत आयोजित केलेल्या सगळ्याच कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकापेक्षा एक अशा सात विषयांची पर्वणी अनुभवता येणार आहे. उत्साही, जिज्ञासू, रसिक पुणेकरांचा या कार्यक्रमालादेखील उत्तम प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. 

 'महाराष्ट्राची नवी सकाळ’ या अंतर्गत हा महाराष्ट्रातील पाचवा कार्यक्रम असणार आहे. येत्या वर्षभरात जवळपास ११ शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आजवर 'स्वयं टॉक्स'साठी जमलेल्या प्रेक्षकांमध्ये विविध क्षेत्रातील विद्यार्थी, उद्योगपती, व्यावसायिक, कलाकार, बुद्धिवंत अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा सहभाग आढळून आला आहे. या कार्यक्रमात आल्यावर अशा अनेक मान्यवरांना भेटण्याची संधीदेखील मिळू शकते. विद्यार्थ्यांनी, विशेषतः तरुणांनी या कार्यक्रमास उपस्थित राहायलाच हवे. जेणेकरून विचारांना नवी दिशा आणि मेंदूला नवे बूस्टर मिळेल. तर बाणेर येथील बंटरा भवन या अलिशान सभागृहात आपणही येताय ना? आजच आपले तिकीट दिलेल्या लिंकवर आरक्षित करा.

https://www.ticketalay.com/event-details/swayam-talks---pune--2024/136 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.