Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात! वित्त विभागाला खर्चाबाबत भेडसावतेय चिंता

खर्चाबाबत चिंता व्यक्त केलेली असतानाही मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिल्याचं समोर आलं आहे.
Ladki Bahin Yojna_
Ladki Bahin Yojna_
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या योजनेपोटी दरवर्षी ४६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळं राज्याच्या वित्त विभागानं या योजनेच्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे.

Ladki Bahin Yojna_
Sangli Flood Viral Video: 'आयर्विन' पूलावरून कृष्णेत उडी; पुरातील स्टंटबाजी आली अंगलट, व्हिडिओ व्हायरल

राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेवर होणाऱ्या खर्चाबद्दल वित्त विभागानं चिंता व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागानं महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी आधीच ४,६७७ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. पण तरीही 'लाडकी बहीण' योजनेला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली, अशी माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojna_
Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिनानिमित्त PM मोदींचा पाकला इशारा; म्हणाले, आता पूर्ण क्षमतेनं....

आता या योजनेची अंमलबजावणी करताना राज्याची आर्थिकस्थिती पाहता, आवश्यक निधीची व्यवस्था कशी करायची? याची चिंता वित्त विभागाला भेडसावत आहे. आत्तापर्यंत 40 लाखांहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती, मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.