केवळ खिरापती वाटून आर्थिक स्वावलंबन कसे साधणार? राज्य सरकारने महिलांच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या कल्पक योजना आणण्याची गरज आहे. अशा काही योजनांविषयी...
महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ लागू केली आहे. पण ती महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पोषक आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. आर्थिक स्वावलंबन देणारी ही योजना अशी जाहिरात केली जाताना १५०० रुपयांत आर्थिक स्वावलंबन कसे होणार? आहे, याची चिकित्सा करायला हवी.