- डॉ. अजित कानिटकर
अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता केवळ क्रीडांगणातल्या एक-दोन तासांच्या खेळातूनच आपोआप विकसित होतात. अनेक भाषणांतून जे शिकवता यायचे नाही ते खेळाच्या मैदानावर उमजून जाते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत हे जेव्हा आपल्या समाजाला कळेल तो दिवस क्रीडासंस्कृतीचा उत्कर्षबिंदूच! तो गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.