- डॉ . अजित कानिटकरदिव्यांगांना योग्य संधींची, अनुकूल वातावरणाची, पुरेशा शाबासकीची आणि त्याहीपेक्षा जास्त दिलदार समाजमान्यतेची गरज असते. पॅरिसमधील स्पर्धेत दिव्यांगांनी केलेली कामगिरी स्तिमित करणारी तर आहेच; पण त्याचबरोबर बरेच धडे देणारीही आहे. .दिव्यांगांच्या ऑलिंपिक स्पर्धा रोममध्ये १९६०मध्ये भरण्यास सुरुवात झाली, तरी पॅराऑलिंपिक हे नामकरण १९८८च्या सोल (कोरिया) याठिकाणी प्रथम झाले. भारताने १९६८च्या तेलअवीव येथील स्पर्धांमध्ये प्रथम भाग घेतला. २०१६च्या रिओ स्पर्धेत एका पदकावरून (रजत), २०२०च्या टोकियोत आणखी दर्जा उंचावत १९ पदके (पाच सुवर्ण, आठ रजत व सहा कांस्य ) आपल्या खेळाडूंनी पटकावली. पॅरिसमध्ये तर आजवरचा उच्चांक भारतीय खेळाडूंनी गाठला. एकूण २९ पदके ( सुवर्ण ७, रजत ९ आणि कांस्य १३) एकूण पदकांच्या क्रमवारीत आपण टोकयोतील २४व्या पदावरून १८पर्यंत पुढे सरकलो. हे सर्व उच्चांक एक भारतीय म्हणून अभिमान वाटण्याचे. पण चीनची एकूण पदकसंख्या २२० आहे,हेही लक्षात घ्यावे लागते..पॅराऑलिंपिक स्पर्धांचे ब्रीदवाक्य आहे ‘प्रवाही चैतन्य’. अडचणींना न जुमानता, केवळ आंतरिक इच्छाशक्तीच्या ताकदीवर हे सर्व खेळाडू जवळपास अशक्य वाटावेत, असे पराक्रम करतात. अशा कृतीमागची प्रेरणा देणारे हे शब्द, मानवी अचाट शक्तीचे खळाळते प्रकटीकरण! पॅरिसमधील प्रत्येक विजयी खेळाडूवर स्वतंत्रपणे लेख लिहिता येईल. प्रत्येकाची प्रचंड मेहनत या प्रवासात व पदकापर्यंत पोहोचण्याची आहे. त्यातल्या दोनच ठळक व्यक्तींबद्दल मात्र द्विरुक्ती झाली, तरी नोंद घेणे आवश्यक आहे. भालाफेकीत नवदीपसिंगने जो भाला फेकला तो एक ऐतिहासिक क्षण होता. लहानपणी केवळ उंची कमी असल्यामुळे, त्याला शाळेमध्ये- मित्रमंडळीमध्ये व समाजामध्ये सतत घालून पाडून बोलणे ऐकावे लागले. अनेकदा हे बोलणे केवळ शारीरिक व्यंगाबद्दल असले तरी मनावरही खोल जखमा करणारे होते. .समाजाच्या दूषित नजरा झेलत तो मोठा झाला. पण कधीतरी मात्र मनाने त्याच्या ठरवले की, या सगळ्यापलीकडे जाऊन स्वतःचे म्हणून व्यक्तिमत्व जगासमोर आले पाहिजे. त्याच्या समाजमाध्यमातील एका मुलाखतीत ठळकपणे म्हटले आहे, “ मी स्वतःवरच प्रचंड रागावलो होतो. एकीकडे लहानपणापासूनचा हा अपमान आणि दुसरीकडे खेळात प्रगती होत असतानासुद्धा गेल्या तीन-चार वर्षातील सर्व स्पर्धांमध्ये मी सतत चौथ्या क्रमांकावर येऊन अपयशी होत होतो. यातून मला झेप घ्यायची होती आणि ती मला पॅरिसमध्ये घेता आली. एका प्रकारे मी स्वतःचा राग अशा प्रकारे तो भाला लांब फेकून केला!” .‘सकारात्मक प्रवाही ऊर्जा’ म्हणजे आणखी काय वेगळे सांगायचे? दुसरे एक उदाहरण म्हणजे तिरंदाजीमधील शीतल देवी. वय वर्षे फक्त १७. दोन्ही हात नसताना, पायात धनुष्य पकडलेले व दाताने बाण धनुष्यात ठेवून तिने शेवटच्या फेरीमध्ये शेवटचा बाण अक्षरशः अचूकपणे दहा गुणांच्या वर्तुळामध्ये मारला आणि पदक खेचून घेतले. तिच्या खेळाचे चित्रण बघताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. या यशाच्या निमित्ताने समाजातील दिव्यांगांचे स्थान, आणि त्यांच्या प्रगतीसाठीचे पोषक वातावरण कसे तयार करता येईल, याविषयीच्या व्यापक जागृतीचा मुद्दा विचारात घ्यायला हवा. मोठी सुप्त शक्ती केंद्र सरकारच्या २०११च्या आकडेवारीनुसार, भारतात १२१ कोटींपैकी दोन कोटी ६८ लाख (म्हणजे सुमारे २. ३ टक्के) दिव्यांगांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये १४५ कोटीपैकी ही संख्या चार कोटी असू शकेल, असा अंदाज आहे, याचे कारण २०११ नंतर शासनाने नव्याने लोकसंख्या मोजणी केलेली नाही. विविध कारणांनी शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा अधू, ज्यांना दिव्यांग असे म्हटले जाते. शरीरातील एखादा अवयव पूर्ण स्वरूपात काम करत नसला तरी ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे निरुपयोगी नाही. .या खेळाडूंच्या देदिप्यमान यशामुळे दोन महत्त्वाचे धडे हे सर्वच समाजाने शिकले पाहिजेत. अपार परिश्रम, ध्येयाप्रती निष्ठा व कामामधील सातत्य याला पर्याय नाही! कोणते तरी शारीरिक व्यंग असतानाही या सर्व खेळाडूंनी वर्षानुवर्षे चिकाटीने, न कंटाळता, प्रसंगी अपयश आले तरी त्यांच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अक्षरशः घाम व अश्रू गाळले. बहुसंख्य समाजाचा पाठिंबा नसताना केवळ स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर त्यांनी ठरवलेल्या खेळात प्रावीण्य मिळवणारच हा ध्यास सोडला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी केवळ श्रम नाही तर भरपूर पैसे खर्च करून या ध्यासाला पाठिंबा दिला. असे अपरिमित श्रम केल्यानेच सुवर्णपदक अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची पदके मिळतात, हा यातील महत्त्वाचा धडा. कोणत्याही यशासाठी शॉर्टकट नसतो. हेच या सर्व खेळाडूंच्या यशातून सिद्ध होते. ऑलिंपिक चळवळीमध्ये तीन महत्त्वाची मूल्ये खेळाच्या द्वारे समाजामध्ये रुजू होतील, असा प्रयत्न आहे. त्यातील उत्तमता हे पहिले मूल्य या सर्व खेळाडूंनी दाखवून दिले आहे. ही शिकवण सर्वच समाजाला अनुकरणीय अशी आहे. .दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे या खेळाडूंच्या यशामुळे आपल्या समाजातील असे अनेक वंचित व अभावग्रस्त समाजघटक सर्वांच्या डोळ्यासमोर ठळकपणे आले आहेत. त्यांना संधी मिळण्याची व आपले मानण्याची नितांत गरज आहे. लाखो मुले-मुली, युवक-युवती अशा शारीरिक व्यंगांमुळे समाजात सर्वसाधारण नागरिकांसारखे सहजपणे सामावले जात नाहीत. ‘समाविष्ट होत नाहीत’ हे म्हणणे चूक आहे. अन्य समाज त्यांना समाविष्ट करून घेत नाही हेच वास्तव आहे. त्यांच्या शारीरिक व्यंगांकडेच बोट ठेवले जाते. त्यांच्याकडील असलेल्या प्रचंड शक्तींकडे दुर्लक्ष होते. आपल्या पंतप्रधानांनी अपंग या ऐवजी दिव्यांग हा शब्द काही वर्षांपूर्वी रूढ केला. त्यावेळेस शब्दच्छल म्हणून काहींनी थट्टाही केली होती. .पॅरिस पॅराऑलिंपिकमधील यशामुळे मात्र आपले खेळाडू हे दिव्यांग आहेत, त्यांनी खरोखरच भव्य-दिव्य कामगिरी करून दाखवली आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यांच्यासारखेच समाजामध्ये असलेले लाखो बंधू भगिनी अशाच प्रकारची अन्य क्षेत्रात कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. त्यांना योग्य संधीची, अनुकूल वातावरणाची, पुरेशा शाबासकीची आणि त्याहीपेक्षा जास्त दिलदार समाजमान्यतेची अपेक्षा आहे. पॅरिस स्पर्धांचा हा धडा आहे. ऑलिंपिकमधील निर्भेळ यशामुळे दिव्यांगांचा मान समाजामध्ये वाढेल व त्यांनाही सर्वसाधारण नागरिकांप्रमाणेच अनेकविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवण्याची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी ही आशा यानिमित्ताने करूयात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.