Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पतीने पत्नीचा 30 वेळा अर्ज भरला अन् 26 वेळा पैसे मिळवले; नेमकं प्रकरण काय?

Fraud in Ladki Bahin Yojana : साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल ३० वेळा अर्ज दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
Updated on

मुंबई- सध्या राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. असे असताना या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे. साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल ३० वेळा अर्ज दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं बोलण्यात येत आहे. या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल ३० वेळा अर्ज दाखल केल्याचं समजत आहे. पोलिसांनी हे वास्तव समोर आणलं आहे. एकाच व्यक्तीच्या नावे ३० वेळा अर्ज दाखल केला गेला असल्याने त्याचा फटका इतर महिलांना बसत असल्याचं बोललं जात आहे.

प्रकार कसा समोर आला?

माहितीनुसार, साताऱ्याच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा ३० वेळा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्याला २६ अर्जांचे प्रत्येकी १५०० रुपये असे पैसे मिळाले देखील आहेत. व्यक्तीने यासाठी विविध आधार क्रमांकाचा वापर केला असल्याचं कळत आहे. नवी मुंबईतील एका महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अर्ज भरल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर या महिलेने तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.