Prithviraj Chavan : मनोज जरांगेंना काही इजा झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार

मराठ्यांचा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून गंभीर पावले उचलावीत.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sakal
Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - मराठ्यांचा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून गंभीर पावले उचलावीत. जरांगे पाटील यांना काहीही इजा झाल्यास त्याला सर्वस्वी राज्य सराकर जबाबदार असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आमदार पृत्वीराज चव्हाण यांनी दिला.

आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवदा सादला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रीया दिली. आमदार चव्हाण म्हणाले. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या आजचा नववा दिवस आहे. दिवसेंदेवस त्यांची प्रकृती खालवते आहे. अशी माहिती येत आहे. मात्र जरांगे पाटील यांचा जीव वाचणे गरजेचे आहे. त्यांचा जीव वाचवमे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

सरकारला विनंती आहे की, जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगीत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः त्यात लक्ष घालावे. त्यांनी गंभीर पावले टाकली पाहिजेत, त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे. संवादातून आशादायक चित्र निर्माण केले पाहिजे.

आमदार चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे व जरांगे-पाटील यांच्यात जेंव्ही बैठक झाली. त्यानंतर सर्वत्र आनंदी वातावरण होते. मात्र आता कुठेतरी सरकारने दिलेला शब्द मोडला आहे, अशी भावना झाली आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समजाच्या ज्या मागण्या आहेत. त्या मागण्यांचा गंभीर विचार करावा. ज्यांची हवी आहे, त्यांची मदत ग्यावी.

चर्चा चालू ठेवत जरांगे पाटील यांना काहीही करून उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचवावा. ते अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना काहीही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, जरांगेचे उपोषण थांबविण्यासाठी आमच्या सगळ्यांचे सरकारच्या प्रयत्नाला सहकार्य राहील.

प्रश्न कितीही मोठा असला तरी तो काही जरांगेच्या जीवापेक्षा मोठा नाही. तो प्रश्न आज ना उद्या सुटेल. नवीन सरकार आल्यानंतरही सुटेल, परंतु आज जरांगे-पाटलांचा जीव वाचणे अत्यंत गरजेचे आहे. मी व्यक्तीगत माझ्यातर्फे मनोज जरांगे पाटलांना विनंती करतो. की, आपण वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपले उपोषण स्थगीत करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.